ETV Bharat / city

Supriya Sule On Disha Salian Controversy : दिशाच्या मृत्यूवरुन राजकारण थांबवावे - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Feb 23, 2022, 12:55 PM IST

मागील काही दिवसांपासून दिशा सालीयन मृत्यू प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुलीच्या मृत्यूवरुन राजकारण थांबवावे, असे सुळे म्हणाल्या ( Supriya Sule On Disha Salian Controversy ) आहेत.

Supriya Sule
Supriya Sule

पुणे - दिशा सालीयन प्रकरणात ( Disha Salian Case ) भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने आरोप केले जात आहे. दिशाच्या कुटुंबीयांनी आम्हाला त्रास देऊ नये, अन्यथा काहीतरी चुकीचे पाऊल उचलावे लागेल, अशी उद्वीग्न प्रतिक्रिया दिली होती. याप्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले आहे. मुलीच्या मृत्यूवरुन राजकारण थांबवावे, असे सुळे यांनी म्हटलं ( Supriya Sule On Disha Salian Controversy ) आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकतर मी देखील एक मुलगी असून, मला देखील एक मुलगी आहे. इतके एखादे असंवेदनशील राजकारण होऊ नये की त्याच्यात आपण आपल्या मुलींना घेऊन यावे. ज्याची मुलगी गेली आहे, ते जर असे म्हणतात की आमच्या मुलीबाबत बोलू नका तरीही जर कोणी याचं राजकारण करत असेल तर त्याचा जाहीर निषेध करते. असे घाणेरडं राजकारण कोणी जर करत असेल तर मी त्या आई वडिलांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी राहिल, असेही सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

हा महाराष्ट्र छत्रपतींचा...

महाराष्ट्र हा सावित्रीच्या लेकींचा आहे. हा झाशीच्या राणीचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. हे छत्रपतींचे नाव भाषणात घेतात. मात्र, जर छत्रपतींनी जेवढा मानसन्मान महिलांचा केला आहे. तेवढा जर यांनी किंवा त्यातील 10 टक्के जरी केलं असते, तर चांगले झाले असते. पण, दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असे घाण राजकारण करून राज्याचा नाव बदनाम करत आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हेही वाचा - Sharad Pawar on Nawab Malik : 'सरकार विरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.