ETV Bharat / city

नव्या वर्षात मेट्रो पुणेकारांच्या सेवेत; वानज ते गरवारे कॉलेज, पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचे काम पूर्ण

author img

By

Published : Nov 4, 2021, 4:40 PM IST

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचे एकत्रितरित्या 65 टक्के काम पुर्ण झाले आहे. तर या मार्गाचे उर्वरीत काम 31 डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्याचे सध्या नियोजन आहे. मेट्रोचे सर्व काम पुर्ण झाल्यानंतर केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गाची पाहणी केली जाणार आहे, असेही विनोद कुमार अग्रवाल यांनी सांगितले आहे.

Metro service to Punekar In new year;  work of Wanaj to Garware College, Pimpri to Phugewadi has been completed
नव्या वर्षात मेट्रो पुणेकारांच्या सेवेत; वानज ते गरवारे कॉलेज, पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचे काम पूर्ण

पुणे - पिंपरी आणि पुणेमधील मेट्रो मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर 2021 अखेर हे दोन्ही मार्ग सुरू करण्यात आहेत. त्यापूर्वी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्‍तांना पाहणी झाल्यानंतर हे दोन्ही मार्ग सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती पुणे मेट्रोचे परिचालन आणि यंत्रणा संचालक विनोद कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

मेट्रोचे 65 टक्के काम पूर्ण -

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचे एकत्रितरित्या 65 टक्के काम पुर्ण झाले आहे. तर या मार्गाचे उर्वरीत काम 31 डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्याचे सध्या नियोजन आहे. मेट्रोचे सर्व काम पुर्ण झाल्यानंतर केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गाची पाहणी केली जाणार आहे, असेही विनोद कुमार अग्रवाल यांनी सांगितले आहे.

सर्व कामे वेगाने सुरू -

या दोन्ही मार्गांचे सिव्हिल वर्क पुर्ण झाले असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली आहे. तर यासोबत रूळ टाकण्याचे तसेच विद्युत पुरवठ्यांच्या तारा जोडणे, सिग्नल यंत्रणा आणि स्थानकांची अशी इतर कामं वेगाने सुरू आहेत. ही कामे जास्त वेगाने कशी होतील, याचे नियोजन सुरू आहे आणि ही सर्व कामे एकाच वेळी पुर्ण व्हावी यासाठी 10 वेगवेगळे विभाग कार्यरत असल्याची माहितीही अग्रवाल यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक कामे -

लॉकडाऊनच्या कालावधीत महामेट्रोने गेल्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने काम पूर्ण केले असल्याचे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले. पुण्यातील कात्रज ते निगडी आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मुख्य मार्ग असून या दोन्ही मार्गांचे एकत्रितपणे सुमारे 65 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

आतापर्यंत 2 हजार 261 झाडांचे पुनर्रोपण -

पुणे मेट्रो प्रकल्पात सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पावसाचे पाणी साठवण, बायोडायजेस्टर, वृक्षारोपण, झाडांचे पुनःरोपण आणि हरित इमारती हे काही उल्लेखनीय उपक्रमांचा समावेश आहे. पुणे मेट्रोच्या मार्गिकेत येणारे एकही झाड पुणे मेट्रोने तोडलेले नाही. मेट्रोने आतापर्यंत 2 हजार 261 झाडांचे पुनर्रोपण पूर्ण केले आहे. तसेच, विविध ठिकाणी 15 हजारांहून अधिक नवीन झाडे लावली आहेत. प्रत्यारोपणानंतर 80 टक्‍क्‍यांहून अधिक झाडे जगली असल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होऊनही भाव शंभरी पारच; नागरिकांमध्ये नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.