ETV Bharat / city

खुशखबर! पुण्यात लवकरच सुरू होणार 'मेट्रो'

author img

By

Published : Dec 23, 2019, 9:03 AM IST

पुण्यात लवकरच आता मेट्रो सेवेची चाचणी सुरु करण्यासाठी महामेट्रो सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये दोन मेट्रो ट्रेन 28 डिसेंबर रोजी दाखल होणार आहेत.

Pune Metro
पुणे मेट्रो

पुणे - शहरातील मेट्रोचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. लवकरच आता मेट्रो सेवेची चाचणी सुरू करण्यासाठी महामेट्रो सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये दोन मेट्रो ट्रेन 28 डिसेंबर रोजी दाखल होणार आहेत. ट्रेनचे हे दोन संच नागपूरहून पुण्याकडे पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा... 'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'

या प्रत्येक मेट्रो ट्रेनच्या संचामध्ये 3 कोच असणार आहेत. एका ट्रेनमध्ये 950-970 प्रवासी प्रवास करू शकतात. मेट्रो ट्रेनच्या 3 कोच पैकी 1 कोच महिलांसाठी राखीव असेल. संपूर्ण मेट्रो ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. हे तीनही डब्बे एकमेकांना जोडलेले असतील. त्यामुळे प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहजरित्या जाऊ शकतील.

हेही वाचा... पीएमसी बँक घोटाळा : अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या घराबाहेर आंदोलन

ट्रेनचे संच पूर्णतः स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवले आहेत. वजनाला हलके असलेल्या या संचामध्ये अत्याधुनिक एलईडी प्रकारचे दीवे लावलेले आहेत. बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार आतील दीवे आपोआप कमी-अधिक प्रकाशमान करण्याची यंत्रणाही यात आहे. या ट्रेनचा अधिकतम वेग 90 किमी प्रतितास असणार आहे. ट्रेनमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जिंग सुविधा असून प्रवाशांसाठी दृकश्राव्य सूचनाप्रणाली असणार आहे. सोमवारी नागपूरहून हे ट्रेनचे संच मोठ्या ट्रकमधून पुण्याच्या दिशेने निघाले आहेत.

Intro:पुण्यात लवकरच मेट्रो ट्रेनचे आगमन


पुणे मेट्रोचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे . लवकरात लवकर आता ट्रेन सेवा चाचणी सुरु करण्यासाठी महामेट्रो सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये दोन मेट्रो ट्रेन 28 डिसेंबर
रोजी पुण्यात दाखल होणार आहेत. ट्रेनचे हे दोन संच नागपूरहून निघाले आहेत.

या प्रत्येक ट्रेनच्या संचामध्ये 3 कोच असणार आहेत. एका ट्रेन मध्ये 950-970 प्रवासी प्रवास करू शकतात. मेट्रो ट्रेनच्या 3 कोच पैकी 1 कोच महिलांसाठी राखीव असेल. संपूर्ण मेट्रो ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत . हे तीनही डब्बे एकमेकांना जोडलेले असतील. त्यामुळे प्रवासी एका कोच मधून दुसऱ्या कोच मध्ये सहजरित्या जाऊ शकतील.

हे ट्रेनचे संच पूर्णतः स्टेनलेस स्टील या धातूपासून बनविले आहेत. वजनाला हलके असलेल्या या ट्रेन संचामध्ये अत्याधुनिक एलईडी प्रकारचे दीवे लावलेले आहेत. बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेचे आतील दीवे आपोआप कमी अधिक तीव्र करण्याची यंत्रणाही यात आहे. या ट्रेन चा अधिकतम वेग 90 किमी असणार आहे. ट्रेनमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जिंग सुविधा असून प्रवाशांसाठी दृकश्राव्य सूचनाप्रणाली असणार आहे. आज नागपूरहून हे ट्रेनचे संच मोठ्या ट्रकमधून पुण्याच्या दिशेने निघाले आहेत.Body:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.