ETV Bharat / city

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील आठवड्यात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

author img

By

Published : Aug 6, 2022, 8:00 AM IST

Maharashtra Rain Update : पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा पाऊसाचा जोर हा वाढणार असून राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवसांपासून मुंबई आणि पुणे परिसरात पावसाने सुरुवात केली आहे, अशी माहिती हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update

पुणे - राज्यात जून महिन्यात पाऊसाने हुलकावणी दिल्यानंतर जुलै महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला.आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊसाने हुलकावणी दिली. पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा पाऊसाचा जोर हा वाढणार असून राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

Maharashtra Rain Update

जूनच्या अखेरच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात काही भागांत जोरदार पाऊस बरसणार आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. मात्र, आता मागील 2 दिवसांपासून मुंबई आणि पुणे परिसरात पावसाने सुरुवात केली आहे. त्यातच आता पुढील आठ्वड्यात दिवसांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील आठ्वड्यात या भागात अतिवृष्टी - हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील काही भागांत जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा -

8 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.

9 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

10 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Mumbai High Court : मंत्रीच नाही तर आदेश कुणाला देऊ?; मुंबई उच्च न्यायालयाची मंत्रिमंडळ विस्तारावर टिप्पणी

हेही वाचा - Ajit Pawar On Cabinet expansion : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरतात? विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.