ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 यंदाचा गणोशोत्सव धुमधडाक्यात; पुण्यातील गणेशोत्सवाला धार्मिकतेतून आधुनिकतेचे स्वरूप

author img

By

Published : Aug 30, 2022, 5:25 PM IST

पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्या सांस्कृतिक राजधानीत सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील गणेश उत्सव Ganesh festival in Maharashtra आहे. लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव Ganeshotsav 2022 सार्वजनिक करण्यास सुरुवात केली दिवसेंदिवस वर्षानुवर्षी या गणेशोत्सवाचे पारंपारिक ते आधुनिक रूप होत गेले आहे.

Ganeshotsav pune
पुण्यातील गणेश उत्सव

पुणे : पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्या सांस्कृतिक राजधानीत सगळ्यात महत्त्वाचा उत्सव Ganeshotsav 2022 म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील गणेश उत्सव Ganesh festival in Maharashtra आहे. लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक करण्यास सुरुवात केली दिवसेंदिवस वर्षानुवर्षी या गणेशोत्सवाचे पारंपारिक ते आधुनिक रूप होत गेले आणि आज पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत पुण्यातील गणेश उत्सव Ganesh festival in Pune पाहण्यासाठी जगभरातून या ठिकाणी नागरिक येत असतात. पुणे शहरात 3566 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून घरगुती गणपतींची संख्या ही 454686 इतकी आहे.

अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित - लोकमान्य टिळकांना असे लक्षात आले .जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरात गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता. पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. गणेश चतुर्थी ला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो.


पश्चिम महाराष्ट्रातील गणेश परंपरा - पुणे शहरामध्ये आज 3600 गणेश मंडळ आहेत जे हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि मोठ्या जनजागृतीने सामाजिक प्रबोधनाने एक वेगळी परंपरा घेऊन पुणे शहरांमध्ये हे सगळे मंडळ आज उत्सव साजरी करत आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील गणेश परंपरा म्हणजे अपश्चिम महाराष्ट्रामध्ये घरातील गणपती हे कोणी दीड दिवसाचा बसवतो कोणी दोन दिवसाचा कोणी पाच दिवसाचा शक्यतो पुणे शहरात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवसाचा गणपती मोठ्या प्रमाणात बसवला जातो कारण त्या दिवशी गौरी विसर्जन असते आणि गौरी आणि गणपतीचे विसर्जन केल्यानंतर सर्वच नागरिक हे मोठ्या गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणे शहरात येतात त्यामुळे पाच दिवसाचा गणपती हे देखील पश्चिम महाराष्ट्राची फार मोठी परंपरा आहे.



स्वातंत्र्यपूर्व काळातले गणपती - पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्यामुळे पुण्यामधील गणेश उत्सवाच्या सर्वप्रथम प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व गणेशोत्सवावर आहे पुण्यात जे पाच मानाचे गणपती आहेत त्या पाच मानाच्या गणपतींना प्रथम स्थान दिले जातं मिरवणुकीमध्ये सुद्धा आणि विसर्जनामध्ये सुद्धा त्या पाच मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरच बाकी सर्व गणेश मंडळांना लक्ष्मी रोड वरून विसर्जन करण्यास परवानगी दिली जाते.पाच मानाच्या गणपती कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती ,गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरी गणपतीमध्ये काही गणपती स्वातंत्र्यपूर्व काळातले आहेत तर काही गणपती हे लोकमान्य टिळकाने सुरू केल्यानंतरचे आहेत. परंतु टिळकाने सुरू केल्यानंतर याला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झालं .पश्चिम महाराष्ट्रात विशेषत पुण्यातील जे गणेश मंडळ आहेत त्यांचे देखावे हे जगभरामध्ये उत्सुकतेचा विषय असतो आणि त्यासाठी लोक पाहण्यासाठी पुण्यात येतात. मिरवणुकीसाठी विसर्जनासाठी प्रचंड अशी गर्दी असते.



गौरी विसर्जनासोबत त्या गणेशाचे विसर्जन - लोकमान्य टिळकांचे या ठिकाणी कर्मभूमी असल्यामुळे या ठिकाणचे सर्वच छोटे-मोठे जे मंडळ आहेत ते आपल्या आपल्या नुसार होता होईल तेवढा उत्साह मोठा करण्याचा प्रयत्न करतात त्याला सामाजिक झाला असते आणि पुण्यातील गणेश उत्सवाचे मुख्य आकर्षण ढोल ताशा पथक या ढोल ताशा पथकांमुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख आहे . या ढोल ताशा पथकामध्ये आता मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलीही सहभागी होत आहेत त्यामुळे त्याला सुद्धा एक नवी ओळख आता मिळालेली आहे. पुण्यामध्ये ज्या पेठा आहेत त्या पेठामध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला जातो घरगुती गणपती कोणी तीन दिवसाचा बसवंत तर कोणी पाच दिवसाचा गणपती बसवतात त्या पाच दिवसाच्या गणपती मध्ये गौरी विसर्जनासोबत त्या गणेशाचे विसर्जन केले जाते आणि त्यानंतर पुणेकर मात्र मोठ्या मोठ्या गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी येत असतात.पश्चिम महाराष्ट्रातले अनेक लोक हे आता अमेरिकेत आहेत त्या ठिकाणी सुद्धा पुण्यामधून गणेश मुर्त्या घेऊन जातात.




दोन दिवस चालतात मिरवणुका - पुण्यामध्ये मानाच्या पाच गणपती बरोबरच अनेक गणपती हे प्रसिद्ध आहे त्यात दगडूशेठ हलवाई गणपती आहे त्याचबरोबर बहुरंगारी गणेश मंडळ आहे हुतात्मा बाबू गेनू गणेश मंडळ आहे तसेच अखिल मंडई गणेश मंडळ आहे असे अनेक गणेश मंडळे आहेत ज्या गणेश मंडळामुळे पुण्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे देशभरातून लोक या गणेशोत्सवाला पाहण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी पुण्यात येत असतात .आणि दरवर्षी गणेशोत्सवात नवीन काहीतरी पाहायला मिळणार या खात्रीने पुणेकर सुद्धा यात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक नागरिक भक्त हे पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी खास करून देखावे पाहण्यासाठी पुण्यात येतात.पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका हे पाहण्यासाठी सुद्धा जगभरातून गणेश भक्त पुण्यात येत असतात जवळपास दोन दिवस या मिरवणुका चालतात पहिल्या पाच मानाच्या गणपतींना पुण्यातील मुख्य लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी सुरुवात होते पहिल्या पाच मानाच्या गणपती नंतर शेवटचा विसर्जन हा दगडूशेठ गणेश मंडळाचा होतो.

हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 अष्टविनायकांमधील प्रत्येक गणपतीची आहेत वेगवेगळी वैशिष्ट्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.