ETV Bharat / city

Rishikesh Tambe Murder Case: फरार सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या; दुचाकीला मागून धडक देऊन केले धारदार शस्त्राने वार

author img

By

Published : Oct 18, 2022, 4:11 PM IST

खडकवासला धरणाच्या भिंतीला लागून मुख्य सिंहगड रस्त्यावर (brutal murder on Sinhagad road Pune) आज पहाटेच्या सुमारास फरार सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या (fugitive criminal brutal murder) करण्यात आली आहे. ऋषिकेश तांबे (वय 30, रा. गोळेवाडी, डोणजे) (Rishikesh Tambe Murder Case) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime) (latest news from Pune)

Rishikesh Tambe Murder Case
Rishikesh Tambe Murder Case

पुणे: खडकवासला धरणाच्या भिंतीला लागून मुख्य सिंहगड रस्त्यावर (brutal murder on Sinhagad road Pune) आज पहाटेच्या सुमारास फरार सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या (fugitive criminal brutal murder) करण्यात आली आहे. ऋषिकेश तांबे (वय 30, रा. गोळेवाडी, डोणजे) (Rishikesh Tambe Murder Case) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. (Pune Crime) (latest news from Pune)

पूर्ववैमनस्यातून हत्येचा संशय - काही दिवसांपूर्वी डोणजे येथील एका तरुणावर जीवघेणा हल्ला करुन तो फरार झाला होता. आज पहाटेच्या सुमारास ऋषिकेश तांबे हा डोणजे बाजूकडून पुणे बाजूकडे दुचाकीवरुन जात असताना अगोदर त्याच्या दुचाकीला अज्ञात हल्लेखोरांनी मागून धडक दिली व त्यानंतर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. यात ऋषिकेश तांबे याचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे. सकाळच्या वेळी मुख्य रस्त्यावर मृतदेह पडलेला पाहून काही नागरिकांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली.

पोलीस घेताहेत हल्लेखोरांचा शोध- तातडीने हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, निरंजन रणवरे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपासासाठी पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिली आहे. "मृत तरुण हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला होता. अद्याप ही हत्या कोणी केली याबाबत माहिती मिळालेली नाही, परंतु पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता आहे. तपासासाठी पथके रवाना करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.