ETV Bharat / city

Ajit Pawar VS Devendra Fadnavis : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच दिवशी वाढदिवस, पुण्यात कार्यकर्त्यांची शुभेच्छांसाठी बॅनर बाजी !

author img

By

Published : Jul 21, 2022, 10:35 AM IST

पुण्यात माझी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली चढावोढ दिसत आहे. 22 जुलै रोजी या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे बॅनर आता शहरभर लागले आहेत. मात्र अलका चौकात समोरासमोरच बॅनर लावण्यात आलेले आहे.

Pune Banner Politics
Pune Banner Politics

पुणे - राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पुण्यात मात्र माझी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली चढावोढ दिसत आहे. 22 जुलै रोजी या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे, ( Ajit Pawar VS Devendra Fadnavis ) आणि या वाढदिवसाचे बॅनर आता शहरभर लागले आहेत. ( Pune Minister Banner ) मात्र अलका चौकात समोरासमोरच बॅनर लावण्यात आलेले आहे.

पुण्यातील अलका टॉकीज चौकात बॅनरबाजी - एका बॅनरमध्ये अजित पवार एकच पालक अजित पवार असे लिहिलेला आहे. देवेंद्र फडवणीस यांच्या बॅनरवर निष्कलंक नेतृत्व निर्विवाद कर्तुत्व असा मजकूर आहे. हे दोन्ही बॅनर पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये समोरासमोर लावण्यात आलेले आहे. ( Ajit Pawar VS Devendra Fadnavis ) त्यामुळे पुण्यामध्ये या दोन्ही बॅनरची सध्या मोठी चर्चा चालू आहे.

Pune Banner Politics

पुण्याचा नेतृत्व करण्यास सक्षम - आगामी महानगरपालिकेत आपलाच पक्ष विजयी व्हावा, यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापला नेता हाच खरा पुण्याचा नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे या बॅनरबाजी मधून दाखवत तर नाही का ? असा प्रश्न पुणेकरांना पडलेला आहे. ( Pune Minister Banner ) राज्यात सत्तांतर जरी झाली असली, तरी अजित दादा हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक नवी उमेद दिसत आहे. या दोन्ही नेत्यांची कार्यकर्ते मात्र, आपल्या नेत्याच्या बॅनर बाजी मधून पुणे करांना कोण सक्षम नेतृत्व आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

अजित पवारांनी केली होती विधानसभेत फटकेबाजी - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( NCP Leader Ajit Pawar ) यांनी चांगलीच फटकेबाजी केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना जर मुख्यमंत्री व्हायचे होते तर, त्यांनी माझ्या कानात येऊन सांगायला हवे होते. मीच उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री करायला सांगितले असते, असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला. तसेच शेजारी बसलेल्या आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्याकडे इशारा करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला जमले असते असे विचारले. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही आपण त्यांना सांगितले असल्याचे सभागृहात सांगितले. एकूणच नव्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन भाषणादरम्यान दोन्हीकडून चांगलेच फटकेबाजी झालेली पाहायला मिळाली होती.

जे झालं ते योग्य होतं का ? - भाजपच्या आमदारांनी सद्सदविवेक बुद्धीने सांगावे. राज्यात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून सुरू असलेले राजकारण पाहता आता सत्तेत बसलेल्या मूळ 105 भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आपल्या सद्सदविवेक बुद्धीला प्रश्न विचारावा, असा मिश्किल टोला अजित पवारांनी भाजपला लगावला. तसेच अनेक वर्षात राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते झटले. पक्षासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. मात्र, आता सध्या जर भारतीय जनता पक्षाकडे पाहिले तर बाहेरूनच आलेल्या लोकांना जास्त महत्व दिले जाते. विधानसभेच्या पहिल्या बाकावर ही भारतीय जनता पक्षाचे मूळ नेते दिसत नाहीत. त्यांच्याकडे महत्त्वाची पद दिली जात नाही, असा टोला आपल्या भाषणातून अजित पवारांनी लगावला होता

फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने भाजप दुःखी असल्याचा लगावला होता टोला - देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वतः मुख्यमंत्री होणार नाहीत याची घोषणा प्रसार माध्यमांसमोर केली. ही घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दुःख पसरले होते. गिरीश महाजन तर अद्यापही आपल्या फेट्याने आपले डोळे पुसत आहेत, असा टोला अजित पवारांनी गिरीश महाजन आणि भाजपच्या नेत्यांना लगावला. तसेच भाषणादरम्यान चंद्रकांत पाटील आपल्या समोरील बाक वाजवत असताना त्यांच्यावरही मिस्कील टीका अजित पवारांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी एवढा जास्त बाक वाजवू नये. त्यांना नवीन सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचा चिमटा अजित पवारांनी आपल्या भाषणातून काढला.

हेही वाचा - Letter of Raj Thackeray : मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, राज ठाकरेंचे सह्याद्री वाहिनीला पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.