ETV Bharat / city

कुत्री सोडल्यासारखी तपास यंत्रणा सोडली, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका

author img

By

Published : Jul 18, 2021, 7:27 PM IST

Updated : Jul 18, 2021, 9:37 PM IST

दुर्दैवाने आज मोदी सरकारच्या काळात या सर्व चौकशा सोडल्या आहेत. एखाद्याच्या अंगावर कुत्रा सोडल्यासारख्या चौकशा सुरू करायच्या आणि अंतिम निर्णय कुठेच घ्यायचा नाही. अशा पद्धतीने केंद्राकडून ईडीच्या चौकशा सुरू आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे - दुर्दैवाने आज मोदी सरकारच्या काळात या सर्व चौकशा सोडल्या आहेत. एखाद्याच्या अंगावर कुत्रा सोडल्यासारख्या चौकशा सुरू करायच्या आणि अंतिम निर्णय कुठेच घ्यायचा नाही. अशा पद्धतीने केंद्राकडून ईडीच्या चौकशा सुरू आहेत. अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

कुत्री सोडल्यासारखी तपास यंत्रणा सोडलीय, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका

फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी चौकशीचा वापर -
चौकशी कशा व्हायला पाहिजे, तर एखादा गुन्हा घडला असेल तर त्या गुन्हेगाराला योग्य न्यायप्रक्रिया झाल्यानंतर शिक्षा व्हायला पाहिजे. हे कुठेही आज होताना दिसत नाही. अनेक जणांना तुरुंगात टाकले, काहींवर धाडी टाकण्यात आल्या, तर काहींवर कारवाई देखील करण्यात आली. पण शेवटी काहीही होताना दिसत नाही. ज्यांनी पक्ष बदलला, त्यांच्या चौकशा होत आहेत. एखादा व्यक्ती दोषी असेल तर त्याला न्यायप्रक्रिया करून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देऊन मग त्याला कोर्टातून शिक्षा दिली पाहिजे. आता या चौकशी समितीचा फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी उपयोग होत आहे, असा आरोपही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

'उद्धव ठाकरेंना आता पंतप्रधान केलं पाहिजे'

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रीय आहे आणि तसा सर्व्हेही झाला आहे. आता त्यांना पंतप्रधान केले पाहिजे. लोकाभिमुख प्रशासन देणे हे शक्य आहे आणि ते करताही येते. मोदींची फक्त प्रसिद्धी आहे. मोदींच्या अकार्यक्षमामुळे आज देशात किती लोकांचे नाहक प्राण गेले. हे आपल्याला कळणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.

अकार्यक्षम मंत्र्यांमुळे देशाचे नुकसान झाले, त्याला मोदी जबाबदार -
आम्ही कोरोनाच्या काळात आरोग्य हाताळण्यात अपयशी ठरलो आहे म्हणून मोदी सरकारने आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला. शिक्षण खात्यांचा खेळखंडोबा झाला म्हणून त्यातही खांदेपालट करण्यात आली. कामगार कायद्यातही असेच झाले. म्हणून त्यातही बदल करण्यात आला. राजकारणात एक सभ्यता असते जर या मंत्र्यांना काढायचे होते तर त्यांचा सन्मानाने राजीनामा घ्यायला पाहिजे होता. पण तसे केले गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात वर्षानंतर कळाल की त्यांचे हे मंत्री अकार्यक्षम आहे. अशा अकार्यक्षम मंत्र्यांना जबाबदार पदावर ठेवले त्याला मोदी जबाबदार आहे. असे अपमानीत करून काढून टाकणे हे आम्हाला पटत नाही. अकार्यक्षम मंत्र्यांना अशी जबाबदारीची पद देऊन जे देशाचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई कशी काढणार? असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

नाना पटोलेंच्या विधानांचा विपर्यास केला जातोय -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानांचा विपर्यास केला जात आहे. त्यांचे काम आहे पक्ष वाढवणे आणि ते काम ते करत आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे मत हे राज्य पातळीवर विचारात घेतले जाते. 1999 पासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र निवडणूक लढतच होते. फक्त राष्ट्रीय निवडणुकीत आघाडीबाबत विचार केला जातो. आमचे एकच उद्दिष्ट आहे की राज्यातून भाजपाला हद्दपार करायचे आहे आणि त्यासाठी आम्हाला आघाडी करावी लागली तर स्थानिक पातळीवर आम्ही तसा ही निर्णय घेऊ. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पक्षाची ताकद वाढवण्याचे काम करत आहे आणि त्यांना ते करायलाच पाहिजे, असेही यावेळी चव्हाण यांनी सांगितले.

केंद्र सरकारने वाढविलेल्या करामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ -

कोरोनाकाळ असतानाही मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमध्ये भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला लुटले आहे. एकाच वर्षात पेट्रोल 23 टक्के, डिझेल 28 टक्के, गॅस 41 टक्के इतकी भाववाढ झालेली आहे. देशातील 250 हून अधिक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव 70 ते 75 डॉलर प्रति बॅलर असताना केवळ केंद्र सरकारने वाढविलेल्या करामुळे सामान्य जनतेवर हलाखीची परिस्थिती आली आहे, असेही यावेळी चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा - छातीत दुखत असल्याने किशोरी पेडणेकर रुग्णायात दाखल; दोन दिवसांपूर्वी झाली होती इको चाचणी

Last Updated : Jul 18, 2021, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.