ETV Bharat / city

डॉ. प्रकाश आमटे कर्करोगाच्या उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात

author img

By

Published : Jun 28, 2022, 5:09 PM IST

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे ( Dr. Prakash Amte) यांना कर्करोगावरील उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) पुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Dr. Prakash Amte
डॉ. प्रकाश आमटे

पुणे - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे ( Dr. Prakash Amte) यांना कर्करोगावरील उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) पुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इतर संसर्गांचा धोका टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीना भेटीसाठी न येण्याचे आवाहन रुग्णालय आणि कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान झाल्याने 13 जून रोजी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती. मंगळवार 27 जून रोजी ताप आल्यामुळे परत भरती करण्यात आल्याचे मुलगा अनिकेत आमटे याने कळवले आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांना 27 जून रोजी परत रुग्णालयात भरती करण्यात आल आहे. आता सर्व व्हिझिटरला प्रवेश बंद करण्यात आला आहे. कृपया फोन करून तब्येत विचारू नये, वेळोवळी डॉक्टरांकडून अपडेट कळवले जात आहेत. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो, पण या टेन्शनमध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल, ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा आहे. रुग्णालयात येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे. त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह करू नये, असे यावेळी अनिकेत आमटे यांनी सांगितल आहे.

हेही वाचा- Rebel MLA Eknath Shinde : आम्ही लवकरच मुंबईत परतणार - एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.