ETV Bharat / city

Avinash Bhondwe On Omicron Subtype : बीए-1, बीए-2 आणि बीए-3 हे ओमायक्रॉनचेच प्रकार - डॉ. अविनाश भोंडवे

author img

By

Published : Jan 10, 2022, 5:09 PM IST

ओमायक्रॉनच्या विषाणूंमध्ये जे बीए-1, बीए-2 आणि बीए-3 अशा तीन प्रकारचे ( New Corona Mutation ) उपप्रकार आहेत. या उपप्रकाराचे गुणधर्मदेखील वेगवेगळे आहेत. या तिन्ही उपप्रकारामध्ये बीए-2 हा खूप जास्त वेगाने पसरत आहे. तर बीए-3 यात वेगळ्याप्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. हे सर्व विषाणू ओमायक्रॉनचाच प्रकार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे ( Dr. Avinash Bhondwe ) यांनी दिली आहे.

Dr Bhondwe Omicron Subtype
Dr Bhondwe Omicron Subtype

पुणे - कुठल्याही विषाणूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रकार असतात. त्याप्रमाणे ओमायक्रॉनच्या विषाणूंमध्ये जे बीए-1, बीए-2 आणि बीए-3 अशा तीन प्रकारचे ( New Corona Mutation ) उपप्रकार आहेत. या उपप्रकाराचे गुणधर्मदेखील वेगवेगळे आहेत. या तिन्ही उपप्रकारामध्ये बीए-2 हा खूप जास्त वेगाने पसरत आहे. तर बीए-3 यात वेगळ्याप्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. हे सर्व विषाणू ओमायक्रॉनचाच प्रकार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे ( Dr. Avinash Bhondwe ) यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

काय म्हणाले डॉ. भोंडवे -

डेल्टा हा विषाणू मूळ कोरोनाचे म्युटेशन होऊन बनला होता. आता ओमायक्रॉन हा सुद्धा मूळ कोरोनाच्या विषाणूत 32 प्रकारचे म्युटेशन होऊन बनला आहे. त्यामुळे ओमायक्रॉन हा पूर्णपणे वेगळा विषाणू आहे. हा बनताना यात काही बदल होऊन उपप्रकार घडतात. हे उपप्रकार खूप वेगाने वाढतील आणि जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांना बाधित करणार आहेत. तसेच वेगळी लक्षणे येऊन नागरिक गंभीर होतील. अश्या पद्धतीची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु या उपप्रकारांवर संशोधन झाल्याशिवाय याबाबत अधिकृत माहिती मिळू शकत नाही. पण सध्याच्या परिस्थितीत बीए-2 आणि बीए-1 वाढत आहे. याचा परिणाम रुग्ण प्रसारावर होईल. तर लक्षणे, गंभीर रुग्ण तसेच मृत्यूदर यावर याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. हा विषाणू ओमायक्रॉन विषाणूच असून त्याचे उपचार हे ओमायक्रॉन प्रमाणेच आहे, असे देखील यावेळी डॉ. भोंडवे यांनी म्हटले.

हेही वाचा - Booster Dose Started In Pune : पुण्यात बुस्टर डोसला सुरवात, 'ईटीव्ही भारत'कडून खास आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.