ETV Bharat / city

Deputy CM Ajit Pawar : जरा बारीक व्हा! अजित पवारांनी सीपीसमोर टोचले डीसीपीचे कान

author img

By

Published : Jun 3, 2022, 12:18 PM IST

अजित पवार हे नेहमी धिकाऱ्यांना नेत्यांना सल्ला देताना अनेकदा पाहिले असेल. असाच प्रकार आज पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या समोरच डीसीपींना बारीक होण्याचा सल्ला अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी दिला.

अजित पवार
अजित पवार

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) हे शिस्तप्रिय असून फिटनेससाठी नेहमी जागृत असतात. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना नेत्यांना सल्ला देताना अनेकदा पाहिले असेल. असाच प्रकार आज पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या समोरच डिसीपींना बारीक होण्याचा सल्ला अजित पवार यांनी ( Ajit Pawar advised DCP ) दिला. यामुळे पोलिसांच्या फिटनेसचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.

जरा बारीक व्हा! अजित पवारांनी सीपीसमोर टोचले डीसीपीचे कान



झालं अस की, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात ( Sophisticated bikes for police patrols ) आल्या. यावेळी पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर प्रातिनिधिक चावी स्वीकारण्यासाठी गेले. अजित पवार यांनी चावी देत असताना, डीसीपी यांची तब्बेत पाहून बारीक व्हा असा सल्ला दिला. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पालिका अधिकारी उपस्थित होते. अजित पवार हे स्पष्ट वक्ते असल्याचं नेहमी म्हटले जाते तस ते वारंवार पुढे देखील आले आहे. अनेकदा अधिकारी त्यांच्यासमोर जाताना घाबरतात.

हेही वाचा - कॉसमॉस बँकेच्या लॉकरमधून 16 तोळ्यांचे दागिने चोरीला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.