ETV Bharat / city

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी

author img

By

Published : Aug 21, 2020, 6:03 PM IST

घरगुती गणेशोत्सव सजावटीचे साहित्य घेण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट असूनही महिला उत्सवाच्या तयारीसाठी बोहरी आळी, महात्मा फुले मंडई, शुक्रवार पेठ, शनिपार परिसर खरेदीसाठी बाहेर निघत आहेत.

गणेशेत्सवाच्या खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी
गणेशेत्सवाच्या खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी

पुणे - गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना पुणे शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. घरगुती गणेशोत्सव सजावटीचे साहित्य घेण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट असूनही महिला उत्सवाच्या तयारीसाठी बोहरी आळी, महात्मा फुले मंडई, शुक्रवार पेठ, शनिपार परिसर खरेदीसाठी बाहेर निघत आहेत. मात्र मागील वर्षेच्या तुलनेत यंदा फक्त ४० ते ५० टक्के गर्दी असल्याचं मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.

कोरोनामुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून शहरातील बाजारपेठा बंद होत्या. लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये हळूहळू बाजारपेठ सुरू होत गेली. पण कोरोनाच्या भीतीने नागरिक कमी प्रमाणात बाजारपेठांमध्ये येत होती. सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध आल्याने आत्ता नागरिक आपल्या घराच्या गणपतीसाठी सजावटीचं सामान किंवा विविध खरेदीसाठी हळूहळू बाहेर पडत आहेत.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कमी प्रमाणात रस्त्यावर गर्दी कमी असल्याचे व्यावसायिक सांगत असेल तरी कोरोनाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांमध्ये कोरोनाची भीती आहे असं वाटत नाही. सोशल डिस्टंटन्सीग असेल,मास्क घालणे असेल असे कोणतेही नियम पडताना नागरिक दिसत नाहीत. गणपती पूजनासाठी लागणारी विविध प्रकारची फळे, दुर्गा, विविध प्रकारची फुले, हारच्या स्टॉलवर दिवसभर ग्राहकांची वर्दळ होत आहे.

जेव्हापासून दुकान सुरू झाली आहेत तेव्हापासून हळूहळू ग्राहक येत आहेत. पण गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी फक्त पुणेकरच खरेदीसाठी बाहेर आहे. बाहेरगावाचे लोक जी दरवर्षी येत होती, ती यंदा आली नाहीत. लोकांकडे पैसे नसल्याने फक्त गरजेपुरताच खरेदी करत आहेत. ते ही भाव कमीजास्त करूनच. म्हणून यंदा फक्त पोटापुरतंच धंदा होत आहे, अशी खंत छोटे व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.