ETV Bharat / city

निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO

author img

By

Published : Apr 14, 2021, 2:57 PM IST

Updated : Apr 23, 2021, 1:19 PM IST

Criminal dead in pune
Criminal dead in pune

दोघांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये या सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संबंधित निवृत्त कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचे सीटीटीव्ही फुजेट व्हायरल झाले आहे.

पुणे - पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले. एका सराईत गुन्हेगाराने दारूच्या नशेत रस्त्याने जाणार्‍या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी अडवली. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये या सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संबंधित निवृत्त कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. मनीष काळूराम भोसले (वय 20, रा. बोपोडी) या सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. तर खडकी पोलिसांनी याप्रकरणी अनंत तुळशीराम ओव्हाळ (वय 61) या निवृत्त पोलिसाला अटक केली आहे.

दोघांचीही एकमेकांना मारहाण

आरोपी मनीष हा गुन्हेगार होता. त्याच्या विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. बोपोडी येथील आनंदनगर परिसरात तो राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तर अनंत ओव्हाळ हे रेल्वे पोलीस दलातून निवृत्त झालेले आहे. 12 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. यावेळी मनिष भोसले यांनी काही कारण नसताना त्यांची दुचाकी अडवली आणि त्यांच्यासोबत वाद घातला. आणि दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मनीषने अनंत यांना मारहाण केल्याची दिसत आहे. प्रत्युत्तरादाखल आनंत यांनीदेखील त्याला मारहाण केली. त्यानंतर खाली पडलेल्या मनीषच्या छातीत आनंत ओव्हाळ यांनी लाथा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या

निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO

लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक

नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

Maharashtralockdown : राज्यात कडक निर्बंध लागू, अशी आहे नवीन नियमावली

गोव्यात नाईट कर्फ्यू लागू, अशी आहे नवीन नियमावली

आता ५० वर्षावरील पोलीसांना "नो फील्ड,ओन्ली ऑफिस ड्युटी" - गृहराज्यमंत्री

कुर्डूवाडीत हिंदू तरुणाने निराधार ख्रिश्चन महिलेवर केले ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार

Last Updated :Apr 23, 2021, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.