ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : आता पेट्रोलपंपाच्या वेळातही कपात, 'या' वेळेत सुरू राहणार पंप

author img

By

Published : Mar 20, 2020, 11:04 PM IST

पुणे जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या अधिपत्याखाली 650 पेट्रोलपंप येतात. यातील 150 पुणे शहरात तर उर्वरित ग्रामीण भागात आहेत. या सर्व पंपावर या नवीन वेळानुसार काम केले जाईल.

pune petrol pump
आता पेट्रोलपंपाच्या वेळातही कपात

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी, सरकारी कंपन्या प्रभावित झाल्या असताना आता पेट्रोलपंप चालकांनीही या पार्श्वभूमीवर आपल्या वेळात कपात केली आहे. ऐरवी सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहणारे पेट्रोलपंप आता सकाळी आठ ते दुपारी चार याच वेळेत सुरू राहतील. पुणे जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ही नवीन वेळ अंमलात आणणार असल्याचे पुणे जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी सांगितले.

आता पेट्रोलपंपाच्या वेळातही कपात

पुणे जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या अधिपत्याखाली 650 पेट्रोलपंप येतात. यातील 150 पुणे शहरात तर उर्वरित ग्रामीण भागात आहेत. या सर्व पंपावर या नवीन वेळानुसार काम केले जाईल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे सागर रुकारी यांनी सांगितले. ग्रामीण भागातील पेट्रोलपंप सकाळी सात ते रात्री 11 या वेळेत नेहमीप्रमाणे सुरू राहतील. या वेळा 31 मार्चपर्यंत लागू असतील. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे रुकारी यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.