ETV Bharat / city

Balasaheb Thorat on BJP भाजपची कार्यप्रणाली लोकशाहीसाठी घातक; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

author img

By

Published : Sep 6, 2022, 8:12 PM IST

Balasaheb Thorat on BJP भाजपाची तत्व प्रणाली आणि कार्यप्रणाली लोकशाहीसाठी हिताची नाही, Balasaheb Thorat on BJP काही करून सत्ता मिळवणे हे भाजपाचे ध्येय हे भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनाला Shrimant Dagdusheth Ganapati Darshana आले होते. त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीवर टीका केली

काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे भाजपाची तत्व प्रणाली आणि कार्यप्रणाली लोकशाहीसाठी हिताची नाही, Balasaheb Thorat on BJP काही करून सत्ता मिळवणे हे भाजपाचे ध्येय हे भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनाला Shrimant Dagdusheth Ganapati Darshana आले होते. त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. नवीन काही आघाड्या होतात. यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात Congress leader former minister Balasaheb Thorat राज ठाकरे सुद्धा आता पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत. Balasaheb Thorat Criticism On BJP पहिले सारखे स्पिरिट त्यांच्यामध्ये आम्हाला दिसत नाही, असे म्हणत निशाणा साधला आहे. त्यामुळे नवीन युती होतील, आघाड्या होतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

बाळासाहेब थोरातांची टीका निवडणूक आयोग ही स्वायत्त्य संस्था आहे. त्याने साहित्य संस्थेसारखे वागावं ही आमची अपेक्षा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी शिंदे गटाने दिलेल्या अर्जावर निवडणूक आयोगाने सुनावणी थांबू नये. असा अर्ज दिल्यानंतर उद्यापासून त्याची सुनावणी होणार आहे. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याप्रकारे भारतीय जनता पार्टी कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी जी काही पद्धत वापरत आहे. ती पद्धत देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. काही करा सत्ता मिळवा ही त्यांची पद्धत आहे. ही तत्वप्रणाली असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्ते शिवाय काहीच दिसत नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महाविकास आघाडी म्हणून एकत्र दसरा मेळाव्याच्या परंपरेमध्ये राजकारण आणू नये, असे म्हणत त्याने दसरा मेळावा हा शिवसेनेचाच व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आजही आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आमच्यामध्ये आजही रोज बैठका होतात. महाविकास आघाडी Maha Vikas Aghadi Govt म्हणूनच आम्ही एकत्र राहिलं तर भाजपाला दूर ठेवू शकतो, आजही आम्ही एकत्र आहोत, असणार असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

बावनकुळेंची टीका चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आज बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलेली आहे. शरद पवार ही टीका केली आहे. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की लोकसभेला आणखी एक वर्ष आहे. त्यावेळेस जनता ठरवेल. परंतु, भाजपा पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्याने तो करावा जनतेतूनच ते ठरवलं जाईल, असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

पुण्यामध्ये माझं कॉलेज जीवन गेलेला आहे. त्यावेळेस सुद्धा मी दगडूशेठच्या दर्शनाला येत होतो आणि आजही दगडूशेठच्या दर्शनासाठी आलो आहे. पुण्यातील विविध गणेश मंडळाला आज बाळासाहेब थोरात भेट देऊन दर्शन घेणार आहेत, त्यासाठी ते आज पुण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.