ETV Bharat / city

China New Corona Variant : चीनमधील नवीन विषाणू डेल्टासारखा प्राणघातक नाही, डॉ. अविनाश भोंडवे

author img

By

Published : Mar 14, 2022, 5:07 PM IST

चीन मध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोघांचे एकत्रीकरण होऊन नवा विषाणू तयार झाला ( China New Corona Variant ) आहे. मात्र, हा नवीन विषाणू डेल्टा सारखा प्राणघातक नसल्याची माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली ( New Corona Variant Not Deadly Bhondwe ) आहे.

Avinash Bhondwe
Avinash Bhondwe

पुणे - जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे केंद्र असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा जीवघेण्या कोरोनाने डोके वर काढले आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोघांचे एकत्रीकरण होऊन एक नवीन विषाणू तयार झाला ( China New Corona Variant ) आहे. या नव्या विषाणुबाबत जानेवारीपासून बोलले जातं आहे. पण, यात ओमायक्रॉन इतकी पसरण्याची शक्यता कमी आहे. तसेच, हा नवीन विषाणू डेल्टा सारखा प्राणघातक देखील नसल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली ( New Corona Variant Not Deadly Bhondwe ) आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे विविध प्रकार समोर आले आहे. कोरोनाच्या आतापर्यंत तीन लाटा आल्या आहेत. त्यात हजारे नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. आता कोरोनाच्या रुग्णांत घट होत आहे. त्यातच पुन्हा नव्या विषाणुची चर्चा होत आहे. हा नवीन विषाणू जरी धोकादायक नाही. मात्र, हा विषाणू कितपत धोकादायक आहे, हे आताच सांगता येणार नसल्याचे भोंडवे यांनी सांगितले आहे.

डॉ. अविनाश भोंडवे माहिती देताना

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चीन लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसतंय. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आवश्यक ती खबरदारी देखील चीनमधील वेगवेगळ्या शहरांतील आरोग्य विभागाकडून घेतली जातेय. चीनच्या चांगचुन या 9 लाख लोकसंख्येच्या शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - Nagpur Crime News : नागपुरात तरुण, तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेमसंबंध असल्याचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.