ETV Bharat / city

Rohit Pawar On Chandrakant Patil: नेत्यांना खुश करायचे असेल, तर ते बंद खोलीत जाऊन खुश करावे; रोहित पवारांची टीका

author img

By

Published : Oct 13, 2022, 4:22 PM IST

Rohit Pawar On Chandrakant Patil: नेत्यांनाच खूश करायची असेल, तर अशा मोठ्या ठिकाणी नाही, तर बंद खोलीत देखील नेत्यांना खूश करु शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची टीका.

Rohit Pawar On Chandrakant Patil
Rohit Pawar On Chandrakant Patil

पुणे: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार NCP Congress MLA Rohit Pawar यांच्या बारामती अ‍ॅग्रो या कारखान्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे BJP MLA Ram Shinde यांनी केली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की राम शिंदे कधी गेले, कधी पत्र दिलं मला माहित नाही. त्यात त्यांनी म्हटल आहे की, शेतकऱ्यांचं ऊस गाळू नये. हे शेतकऱ्यांना देखील पटलेलं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, शेतकऱ्यांच्या हिताचं जर कोणी निर्णय घेत असेल, तर तुम्ही विरोधात का जात आहे. त्यांना जर एवढं कळत नसेल तर मी काय उत्तर द्यायचं. आणि त्यांना किती वेळा उत्तर द्यायचं असे यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवारांची टीका

नेत्यांना खुश करायचे असेल तर... भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी आई- वडिलांना शिव्या द्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना शिव्या देऊ नका, असे म्हटले आहे. यावर रोहित पवार म्हणाले की हे संस्कृतीचा विषय आहे. मी ज्या ज्या सामान्य लोकांशी बोललो, त्यांना ते पटलेलं नाही. आई वडिलांना आपण देव मानतो, पण राजकीय लोकांना खुश करण्यासाठी जर ते अस बोलत असतील तर ते चुकीचं आहे. नेत्यांनी बोलताना नियंत्रण ठेवायला हवे, जर नेत्यांना खुश करायचे असेल तर ते बंद खोलीत जाऊन करावं, असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.

पत्रात आमदार रोहित पवार यांचा उल्लेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून विद्यापीठाकडून वाढवण्यात आलेल्या शुल्कवाढी विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रात आमदार रोहित पवार यांचा उल्लेख केला आहे. यावर रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी पत्र वाचलेलं नाही. त्यात एका व्यक्तीवर झालेल्या अन्याय, पक्षावर झालेलं अन्याय आणि आई आणि मुलाचं संभाषण त्या पत्रात झाला आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न विविध ताकत्यांच्या मदतीने सुरू आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की, कितीही आवाज जरी दाबण्याचा प्रयत्न झाला. तरी संघर्ष हा करावा लागणार आहे.

विद्यापीठाकडून फी वाढ करणे हे चुकीच संघर्ष करत असताना मोठ्या ताकत विरोधात लढावं लागणार आहे. हे त्या पत्रात दिलं आहे. या पत्रामधून एक गोष्ट घेतो की, अन्याय आणि दुसरा संघर्ष. आणि संघर्ष हा करावा लागणार आहे. आमच्यासारखे युवक हे संघर्ष करतील, असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या उपोषण बाबत पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या फी वाढीचा विषय मी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना सांगणार आहे. विद्यापीठाकडून फी वाढ करणे हे चुकीच आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विद्यार्थ्यांचा विषय आम्ही नेणार आहोत. विद्यापीठात शिकणारे मुलं ही साध्या घरातील विद्यार्थी आहेत. हे सरकारी विद्यापीठ आहे. राज्य सरकारने गरज लागली, तर पैसे द्यावेत. पण फी वाढ करू नये, अस यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत राजकारण सिनेटच्या यादीत भाजपचा हस्तक्षेप वाढला आहे. यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की भाजपच काम करण्याची पद्धत म्हणजे ते यादी बघून काम करतात. विद्यार्थ्यांची परिस्थिती ते बघत नाही. सीनेट बद्दल याद्या पारदर्शक व्हायला हवे, असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले. अंधेरी निवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे राजकारण सुरू आहे. त्यावर पवार देखील यांना विचारलं असता, ते म्हणाले की राजीनामा त्यांनी दिला पण ते का सोडत नाही. हे माहीत नाही, पण त्यात वेगळं राजकारण असावं. गेल्या 3 वर्षात वेगळं समीकरण पाहत आहोत. पक्ष फोडणे, आमदार फोडणे अश्या पद्धतीचं समीकरण सुरू आहे. आत्ता लोकांनी अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून बघितल्या आहेत. आज नेत्यांचा आवाज दाबल्या जातोय, उद्या लोकांचा आवाज दाबला जाईल, असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.