ETV Bharat / city

Bus Driver Heart Attack :  एसटी वेगात असतानाच चालकाला आला हार्ट अटॅक अन् पुढे....

author img

By

Published : Aug 4, 2022, 10:27 PM IST

Jalandar Pawar
जालंदर पवार

बस चालकाला, हृदय विकाराचा तीव्र झटका ( Bus driver Dies Of Heart Attack ) आल्याने दुर्दैवी मृत्यू ( unfortunate death ) झाला आहे. ही घटना पुणे -सातारा हायवेवर ( Pune - Satara Highway ) नसरापूर गावाजळ घडली. मृत्यूपूर्वी चक्कर आल्याचे जाणवल्यानं बसचालकाने, प्रसंगावधान दाखवत बस वेळीच रस्त्याच्या बाजूला घेतल्यानं, 25 प्रवाशांचे प्राण वाचले.

पुणे: पुणे -सातारा हायवेवर ( Pune - Satara Highway ) बस चालकाचा, हृदय विकाराचा तीव्र झटका ( Bus driver Dies Of Heart Attack ) आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चक्कर आल्याचे जाणवल्यानं बसचालकाने, प्रसंगावधान दाखवत बस वेळीच रस्त्याच्या बाजूला घेतल्यानं, 25 प्रवाशांचे प्राण वाचले.जालिंदर पवार ( Jalandar Pawar ) असं 45 वर्षीय मृत्यू झालेल्या बस चालकाचs नाव आहे. पुणे - सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजळ ही घटना घडलीय. बस चालकाच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जातीय.

प्रवाशांचे प्राण वाचले - राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे - सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर, मुळचे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पळशी गावच्या 45 वर्षाच्या जालिंदर रंगाराव पवार या बसचालकाला चक्कर येऊ लागली. वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळं बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत. याप्रकरणी बसचे वाहक संतोष गवळी यांनी नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली.

हेही वाचा - Peacock in Raj Bhavan: नाच रे मोरा राजभवनात; पाहा थुई थुई नाचतानाचा व्हिडिओ

बुधवारी वसई वरून आलेली बस दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात पोहचली.यावेळी बस चालक संतोष कांबळे यांना बदली चालक म्हणून जालिंदर पवार आले. खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्या नंतर बसचा वेग मंदावला, त्यावेळेस वाहकाने चालकाला विचारणा केली, तेंव्हा चक्कर येतं असल्याचं सांगत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. वाहकाने पवार यांना पुन्हा आवाज दिला, मात्र चालकानी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. बस चालकाच्या जाण्याने सहकारी एसटी कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जातीय.

हेही वाचा - Student Cross River In Nashik : शाळेसाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास; अंगावर काटा आणणारा हा Video पाहाच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.