ETV Bharat / city

Governor Bhagat Singh Koshyari महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा

author img

By

Published : Aug 14, 2022, 3:40 PM IST

राज्यात साहित्यनिर्मितीसाठी उत्तम वातावरण देखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी केले. राजभवन येथे आयोजित चाकोरी बाहेरचे शिक्षण या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळेंसह आदी मंडळी उपस्थित होते

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

पुणे महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात साहित्यनिर्मितीसाठी उत्तम वातावरण देखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी केले. राजभवन येथे आयोजित चाकोरी बाहेरचे शिक्षण या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळेंसह आदी मंडळी उपस्थित होते संत साहित्याने समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले मराठी वृत्तपत्रातून साहित्य सांस्कृतिक आर्थिक अशा विविध विषयांबाबत उत्तम लेखन पाहायला मिळते उत्तम साहित्यनिर्मितीमुळे इथले ज्ञानभांडार विस्तारले आहे अनेक लेखकांनी यात भर घालण्याचे कार्य केले असेही राज्यपाल म्हणाले



पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणामुळे शिष्यांना भ्रमण करावे लागत असल्याने त्यांना जीवनाचे अनुभव मिळायचे. समाजाविषयी आकलन व्हायचे. विद्यार्थ्यांना अनुभवसिद्ध करणारे असे शिक्षण आवश्यक आहे. विद्यापीठातून सिद्धांत शिकल्यानंतर समाजात मिळणारे व्यावहारिक ज्ञानही महत्वाचे आहे. 'चाकोरी बाहेरचे शिक्षण' या पुस्तकाच्या माध्यमातून चार भिंतीच्या बाहेरील जगातील शिक्षणाचा चांगला परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्य होत असून आदिवासी बांधवांनी बनविलेल्या बांबूच्या राख्यांची एनएसएसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, नैसर्गिक शिक्षणाच्या आधारे समाजाची उन्नती साधता येईल. पुस्तकातून अशा शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारे अनुभव वाचायला मिळतात. डॉ.चाकणे यांनी सामाजिक जाणिवेतून पुस्तक लिहिले असून ते विविध भाषेत प्रकाशित करावे. यावेळी पांडे आणि गोयल यांनीही विचार व्यक्त केले.

हेही वाचा - Mohan Bhagwat Nagpur तरुणाईला ताकद आणि दिशा देण्याची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.