ETV Bharat / city

BJP's Agitation in Pune : पंजाब सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे पुण्यात सत्याग्रह आंदोलन

author img

By

Published : Jan 7, 2022, 7:57 PM IST

BJP's Agitation in Pune
BJP's Agitation in Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे ( PM Security Breach ) उड्डाणपूलावर अडकून पडले होते. याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीनेमहात्मा पुणे स्टेशन येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात ( BJP's Agitation in Pune ) आले होते.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे (PM Security Breach) उड्डाणपूलावर अडकून पडले होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा पंजाब दौरा रद्द करण्यात आला. सदर घटनेमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता वर्तवली गेली होती. पुणे शहर भाजपच्या वतीनेमहात्मा गांधी पुतळा, पुणे स्टेशन येथे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात ( BJP's Agitation in Pune ) आले होते. यावेळी खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar Present on Protest) उपस्थित होते.

भाजपाचे पुण्यात सत्याग्रह आंदोलन

काय प्रकरण ?

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. यावेळी भारतीय किसान युनियनने केलेल्या निदर्शनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावर 20 मिनिटे अडकून पडला होता. त्यानंतर मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले. पंजाब सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाचा अहवाल तीन दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत.

कृषी कायदा रद्द केल्यानंतर पहिला पंजाब दौरा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्यात आला. (Raining In Bathinda When The PM Landed) पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारची सभा रद्द करण्यात आली. ( PM Security Breach In Panjab ) त्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले. ( Raining In Bathindan Punjab Tour ) कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हेदेखील या रॅलीत सहभागी होणार होते.

हेही वाचा - PM Security Breach : पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; भाजपाची काँग्रेसविरोधात देशव्यापी मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.