ETV Bharat / city

ठाकरे सरकारचा नवा पॅटर्न : घोटाळा बाहेर आला की हॉस्पिटलमध्ये भरती - किरीट सोमय्या

author img

By

Published : Sep 28, 2021, 2:08 AM IST

किरीट सोमय्याने घोटाळा काढला की हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं. मला काळजी आहे की उद्या मी घोटाळा काढणार आहे हसन मुश्रीफ यांचा आणि ती पॅटर्न ठाकरे सरकारमधील 12 मंत्र्यांनी तीच पॅटर्न स्वीकारली आहे. मला भीती आहे की या 12 मंत्र्यांचा घोटाळा काढल्यानंतर किती मंत्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार, असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर लगावला आहे.

किरीट सोमय्या

पुणे - सकाळी अंबामाता आणि महालक्ष्मी मातेचा दर्शन घेऊन 12:30 वाजता ज्या मुरगुड नगरपरिषदेने मला आजीवन प्रतिबंध टाकला आहे तिथे जाऊन तिथल्या पोलीस चौकी मध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधातला तिसरा घोटाळा सह तिन्ही घोटाळ्यांची तक्रार दाखल करणार आहे. माझ्या मनात एक नवीन भीती निर्माण झाली आहे की आधी मी जेव्हा घोटाळा बाहेर काढायचो तेव्हा ठाकरे सरकारचे मंत्री आणि नेते गायब व्हायचे आत्ता तर त्यांनी नवीन पॅटर्न सुरू केला आहे. किरीट सोमय्याने घोटाळा काढला की हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं. मला काळजी आहे की उद्या मी घोटाळा काढणार आहे हसन मुश्रीफ यांचा आणि ती पॅटर्न ठाकरे सरकारमधील 12 मंत्र्यांनी तीच पॅटर्न स्वीकारली आहे. मला भीती आहे की या 12 मंत्र्यांचा घोटाळा काढल्यानंतर किती मंत्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार, असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर लगावला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर जात असताना पुण्यातील बाणेर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

गनिमीकावा करणाऱ्यांची अटक झाली का?

मला कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निरोप दिला आहे कि किरीट सोमय्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे शांततापूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. ही माझी खात्री झालेली आहे. त्याअर्थी मी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा बंदीचा आदेश रद्द करत आहे. माझं उद्धव ठाकरे यांना स्पष्ट प्रश्न आहे की गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला होता की गनिमी कावा ने किरीट सोमय्या यांच्या वर हल्ला होऊ शकतो. आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात बंदी करण्यात येत आहे. तर मग जे गनिमीकावा करणार होते त्यांची अटक झाली का ? तो गनिमी कावा कोणी केला होता. मग आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे मान्य करावं की गनिमी कावा करणारे लोक हे त्यांचे होते. मला त्यांचं नाव उघड करता येणार नाही, असं त्यांनी जाहीर सांगावं अस देखील यावेळी सोमय्या यांनी सांगितलं.

आनंद आळसुळे यांनी मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांच्या कडून शिकावं -

आज आनंद आळसुळे यांच्या संदर्भात जी माहिती मिळाली आहे. त्यात मी थोडी स्पष्टता करू इच्छितो की आनंद अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र यांचं सिटी को-ऑपरेटिव बँक वर संपूर्ण ताबा होता. 900 कोटी रुपयांचे डिपॉझिटरांचे पैसे अडकले आहे. रिझर्व बँकेच्या अहवालानुसार 900 कोटींच्या ट्रांजेक्शन मध्ये पारदर्शकता नाही. 93 कोटी रुपये घोटाळ्याच्या द्वारे बँकांच्या बाहेर केलेले आहे. हे रिझर्व बँकेच्या अहवालात लिहिलेला आहे. करोडो रुपये अडसूळे यांच्या कंपन्यांच्या आकाउंट मध्ये पास झालेले आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे गेल्या अठरा महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. प्राथमिकरित्या ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. पोलिसांची आहे सहकार मंत्र्यांची आहे. पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. म्हणून आम्हाला रिझर्व्ह बँक आणि ईडीकडे झाड द्यावी लागली. शेवटी आज ईडी त्यांच्या घरी त्यांना अटक करण्यासाठी गेले होते. माझं आनंद अडसूळ यांना एक सल्ला आहे की त्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याकडून शिकावे मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः त्यांचा बंगला जो इनलिगल होता तो त्यांनी स्वतः हा पडला. संजय राऊत यांनी देखील रात्री पावणेदहा वाजता ईडी च्या मागच्या जिनाने वर गेले आणि 55 लाखाचा जो चोरीचा माला होता तो परत केला. अशा पद्धतीने आनंद अडसूळ यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत केला तर आम्ही ॲक्शन संदर्भात विचार करू असा देखील यावेळी सोमय्या म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.