ETV Bharat / city

Bullock Cart Race in Maharashtra : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचे निर्णयाचे स्वागत - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Dec 16, 2021, 4:37 PM IST

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी ( Supreme Court on Bullock Cart Race ) दिली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( BJP leader on bullock cart race ) प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे - सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील ( lift ban on bullock cart race ) निर्बंध हटविल्याच्या निर्णयानंतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP leader on bullock cart race ) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी ( Supreme Court on Bullock Cart Race ) दिली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( BJP leader on bullock cart race ) प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा-Bullock Cart Race Maharashtra : बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार; सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

काय म्हणाले चंद्रकात पाटील ?

ते म्हणाले की, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत ( Chandrakant Patil welcomes decision of SC ) करतो. सर्वोच्च न्यायालयाने ग्रामीण भागातील जनतेच्या मनाचे समजून घेतले आहे. 2011 साली बैल हा संरक्षित प्राणी म्हणून त्या यादीत आला. त्यानंतर राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक या ठिकाणीदेखील आंदोलने झाली. मग तामिळनाडू सरकारने कायदा केला. मग ते बघून महाराष्ट्रनेदेखील कायदा केला.

हेही वाचा-Bullock Cart Race Maharashtra : अखेर बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार, क्रीडा मंत्र्यांनी केले निर्यणाचे स्वागत

राज्यातील कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. पण आजच्या निर्णयानंतर गावागावात जल्लोष साजरा केला जात आहे. या आंदोलनाला लढा देण्याऱ्या आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे अभिनंदन करतो, असे यावेळी चंद्रकांत पाटील ( MH BJP president congratulations to MLA Mahesh Landge ) म्हणाले.

हेही वाचा-बैलगाडा मालकांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेणार -दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांहून अधिक बैलगाडा शर्यतीची परंपरा

बैलगाडा शर्यत हा ग्रामीण भागात लोकप्रिय व पारंपरिक खेळ (Bullock-Cart Race in Maharashtra) आहे. जत्रा-यात्रांचे मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत. मात्र, ही बैलगाडा शर्यत मागील अनेक दिवसांपासून बंद होती. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडीच्या शर्यतींची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांहून अधिक परंपरा आहे. या शर्यती म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण, बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यानंतर शेतकरी वर्ग नाराज झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.