ETV Bharat / city

वाढदिवसच ठरला अखेरचा दिवस; दुचाकीस्वाराच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

author img

By

Published : Oct 10, 2022, 3:53 PM IST

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे वाढदिवसाच्या दिवशीच (bike rider hit child on his birthday) एका विचित्र अपघातात (Child road accident baramati pune) तीन वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी अंत (bike collision child death) झाल्याची घटना शहरातील इंदापूर रोडवरील हॉटेल शिवम समोर घडली. अरहत थोरात असे या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभांगी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत प्रकाश खळदकर (रा. नानगाव ता दौंड जि. पुणे ) यास ताब्यात घेतले आहे. (Pune Baramati road accident)

bike collision child death
bike collision child death

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे वाढदिवसाच्या दिवशीच (bike rider hit child on his birthday) एका विचित्र अपघातात (Child road accident baramati pune) तीन वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी अंत (bike collision child death) झाल्याची घटना शहरातील इंदापूर रोडवरील हॉटेल शिवम समोर घडली. अरहत थोरात असे या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभांगी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत प्रकाश खळदकर (रा. नानगाव ता दौंड जि. पुणे ) यास ताब्यात घेतले आहे. (Pune Baramati road accident)

दुचाकीस्वाराच्या धडकेत चिमुकल्याचा वाढदिवशीच दुर्दैवी मृत्यू

आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी- मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीची भाची प्रिती प्रमोद थोरात (रा. मळद ता. बारामती जि. पुणे, सध्या रा. सटवाजीनगर बारामती जि. पुणे) यांचा मुलगा अरहत याचा वाढदिवस साजरा करून (दि.9) रोजी रात्री साडेनऊ वाजता सुमारास मेळावा पाहण्यासाठी निघाले होते. फिर्यादी चिमुकल्या अरहत व कुटुंबासमवेत एसटी स्टँड चौक ओलांडून इंदापूर रोडने जय शिवम हॉटेल समोरुन पुढे चालत येत होते. दरम्यान भरधाव वेगाने एक मोटारसायकल येऊन अँगलला धडकली. तो लोखंडी अँगल फिर्यादीच्या पायाला व तीन वर्षाच्या अरहतच्या डोक्याला लागला. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याला तात्काळ शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला दवाखान्यात आणण्यास उशीर झाल्याचे सांगत मृत घोषित केले. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटरसायकलस्वार संकेत खळदकरसह प्राथमिक उपचार न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीत नमूद केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.