ETV Bharat / city

बजाज कंपनीचे संजीव बजाज यांना ई-मेल द्वारे खंडणीची धमकी

author img

By

Published : Jan 9, 2022, 6:43 PM IST

बजाज फायनन्स कंपनीचे संजीव बजाज यांच्याकडे ई-मेलद्वारे अज्ञात हॅकर्सने 12 कोटी रुपयांची खंडणी (Sanjeev Bajaj threatened for ransom via e-mail ) मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बजाज फायनान्स कंपनीतर्फे युवराज मोरे (32, रा. हडपसर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Sanjeev Bajaj
Sanjeev Bajaj

पुणे - बजाज फायनन्स कंपनीचे संजीव बजाज यांच्याकडे ई-मेलद्वारे अज्ञात हॅकर्सने 12 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची (Sanjeev Bajaj threatened for ransom via e-mail ) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बजाज फायनान्स कंपनीतर्फे युवराज मोरे (32, रा. हडपसर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
हे ही वाचा - Sulli Deal App : सुल्ली डिल अ‍ॅपच्या मास्टमाईंडला इंदूरमधून अटक
सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल -

खंडणीची रक्कम न दिल्यास कंपनीचा सर्व डेटा हॅक केला जाईल, ज्यामुळे कंपनीचे मोठं नुकसान होऊ शकतं, अशी धमकी हॅकर्सने दिली आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजीव बजाज, दीपक रेड्डी, दीपक बजारी आणि संजीव जैन यांना natasa.petrova@protomail.com या ई-मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.