ETV Bharat / city

Pune Municipal Corporation : पुण्यातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर होणार कारवाई

author img

By

Published : Jul 26, 2022, 12:34 PM IST

पावसामुळे पुण्यात गेल्या पंधरा दिवसापासून रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना याच्या नाहक त्रास होत आहे.या खड्डासंदर्भात अनेक तक्रारी महानगरपालिकेला ( Municipal Corporation ) देण्यात आले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे कंत्राटदारावर कारवाई ( Action against contractor for substandard performance) करणार आहे.

Action will be taken against the contractor doing poor work on the roads in Pune
पुण्यातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर होणार कारवाई

पुणे : महानगरपालिकेच्या पथकर विभागामार्फत खड्डे बुजवण्यात येत होते. या खड्डासंदर्भात अनेक तक्रारीचा पाऊस महानगरपालिकेमध्ये होता. तसेच याबरोबर सर्वच राजकीय पक्ष, खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ), खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat ), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil ), यांना पत्र देऊन खड्डे बुजवण्याची विनंती केली होती.

पुण्यातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर होणार कारवाई



रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामे निकृष्ट केल्यामुळे रस्त्यात खड्डे पडले आहेत. तर १२० रस्त्यांपैकी ज्या रस्त्यावर काही काम करावे लागली तर काही रस्ते खोदावे लागले आणि त्यानंतर त्यावर खड्डे पडले. महानगरपालिकेला पथकर विभागाने एक अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार आता महानगरपालिका निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राट दारावर कारवाई करणार असल्याचे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितले. महानगरपालिका अखेर ज्या कंत्राट दाराने हे कंत्राट घेतली आणि त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली त्या कंत्रातदारावर आता महानगरपालिकेने कारवाई करणार आहे.

हेही वाचा : National Anthem In PCMC : 15 ऑगस्टपासून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत दररोज सकाळी वाजणार राष्ट्रगीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.