ETV Bharat / city

Child Murder In Pune : पुण्यात कोथरूडमध्ये कॉलेजच्या मैदानावर एका १३ वर्षाच्या मुलाचा खून, मृतदेह पोत्यात बांधून ठेवला

author img

By

Published : Mar 25, 2022, 11:38 AM IST

Updated : Mar 25, 2022, 12:29 PM IST

गुरुवार सकाळी एका ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार पुण्यात घडला ( minor girl Rape in Pune ) होता. हे प्रकरण ताजे असतानाच काल रात्री कोथरूडमधील एकलव्य कॉलेजच्या मैदानावर एका १३ वर्षाच्या मुलाचा खून ( Child Murder In Pune ) करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ( Murder In Pune Kothrud ) आला आहे.

Child Murder In Pune
कॉलेजच्या मैदानावर एका १३ वर्षाच्या मुलाचा खून

पुणे - पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. काल सकाळी एका ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार पुण्यात घडला ( minor girl Rape in Pune ) होता. हे प्रकरण ताजे असतानाच काल रात्री कोथरूडमधील एकलव्य कॉलेजच्या मैदानावर एका १३ वर्षाच्या मुलाचा खून ( Child Murder In Pune ) करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ( Murder In Pune Kothrud ) आला आहे. करण गोपाळ राठोड असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून, त्याचे वय तेरा वर्षे आहे. तो कोथरूड मधल्याच म्हतोबा नगर मध्ये राहतो.

कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांची प्रतिक्रिया

काय आहे संपूर्ण प्रकरण - याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमध्ये असलेल्या एकलव्य कॉलेजच्या मैदानावर काही लहान मुलं खेळत होती. त्या लहान मुलांना मैदानातच एका पोत्यात काहीतरी बांधून ठेवण्याचं लक्षात आलं. मैदानावर खेळणाऱ्या लहान मुलांनी ते पोतं उघडून पाहिले असता त्यात मृतदेह असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि आसपासच्या लोकांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच तातडीने कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यातच पोलीस तपासात मृत्यू झालेला मुलगा हा मुका असल्याचं देखील समजत आहे. विशेष म्हणजे मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे . तसेच त्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

आरोपीला अटक - या प्रकरणातील आरोपी 21 वर्षाच्या पिंटू गौतम या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मृत मुलाचा शेजारी असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत्यूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल आल्यानंतर मुलाच्या हत्येचे मुख्य कारण समोर येईल. आशी माहिती कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली आहे.

हेही वाचा - cargo ship sunk : साहिबगंजमधील गंगा नदीत मालवाहू जहाज बुडाले

Last Updated : Mar 25, 2022, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.