ETV Bharat / city

Goa Legislative Assembly session 2022: आजपासून गोवा विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन

author img

By

Published : Mar 29, 2022, 7:14 AM IST

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यपाल श्रीधरण पिल्लई यांनी गोवा विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन ( Goa Legislative Assembly session 2022 ) बोलावले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.

Goa Legislative Assembly
गोवा विधानसभा

पणजी (गोवा) - विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यपाल श्रीधरण पिल्लई यांनी गोवा विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन ( Goa Legislative Assembly session 2022 ) बोलावले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे, तर दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट मुख्यमंत्री यांच्या हस्ते मांडण्यात येणार आहे.

माहिती देताना गोव्याचे मुख्यमंत्री

हेही वाचा - Spicejet Flight Collision With Pole : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटचे विमान खांबाला धडकले

29 आणि 30 मार्चला गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन संपन्न होणार असून, पहिल्या दिवशी राज्यपाल अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार असून, हे दोन दिवसीय अधिवेशन राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या एका विशेष आदेशान्वये बोलवण्यात आल्याची माहिती विधानसभा सचिवांमार्फत देण्यात आली.

गोवा विधानसभा अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. तूर्तास तरी भाजपचे पारडे जड असून भाजपकडे पंचवीस आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपच्या वतीने काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, काँग्रेसच्या वतीने अलेक्स सिक्वेरा हे उमेदवार असणार आहेत.

भाजपने काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडे सध्या स्वतःचे 20, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यातच विरोधी पक्षातील दोन ते तीन मत भाजपच्या बाजूने वळणार आहेत. त्यामुळे, तवडकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

हेही वाचा - Wooden Treadmill : आंध्र प्रदेशच्या एका कलाकाराने तयार केली लाकडी ट्रेडमिल, आनंद महिंद्रा ट्वीट करत म्हणाले मलाही एक हवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.