ETV Bharat / city

AAP Goa CM Candidate : 'भष्ट्राचारमुक्त गोव्याची हमी देतो'; जाणून घ्या... कोण आहेत अमित पालेकर?

author img

By

Published : Jan 19, 2022, 2:08 PM IST

Updated : Jan 19, 2022, 2:20 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ( arvind kegriwal declared Goa CM candidate ) यांनी अमित पालेकर हे गोव्यात 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ( Amit Palekar AAP CM Candidate ) असल्याची घोषणा केली. अमित पालेकर हे व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजातून येतात, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

कोण आहेत अमित पालेकर
कोण आहेत अमित पालेकर

पणजी (गोवा) - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ( arvind kegriwal declared Goa CM candidate ) यांनी अमित पालेकर हे गोव्यात 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ( Amit Palekar AAP CM Candidate ) असल्याची घोषणा केली. अमित पालेकर हे व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजातून येतात, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

'मी तुम्हाला भ्रष्टाचारमुक्त गोव्याची हमी देतो'

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी निवड झाल्यावर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, मी तुम्हाला भ्रष्टाचारमुक्त गोव्याची हमी देतो. गोव्याचे हरवलेले वैभव आपण परत मिळवू, असा गोवा तयार करू ज्याचे प्रत्येकाने स्वप्न पाहिले होते. मी सांगितलेला प्रत्येक शब्द मी पाळीन आणि तीच माझी हमी आहे,

  • कोण आहेत अमित पालेकर?

अमित पालेकर हे गोव्यात प्रसिद्ध राजकारणी आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची बरीच ओळख आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दावर ते नेहमीच मांडत आले आहेत. पालेकर हे गोव्यातील सांताक्रूझ परिसरात राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. 2017 पासून ते आम आदमी पक्षाशी संबंधित असले तरी त्यांच्यासाठी राजकारण नवीन नाही. त्यांची आई दहा वर्षे सरपंच होती.

  • कोरोना काळात केली मदत -

अमित पालेकर यांनी कोरोनाच्या काळात लोकांना खूप मदत केली. देशभरातील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता असताना पालेकर यांनी स्वत:हून 135 खाटा स्थानिक रुग्णालयाला दान केल्या होत्या. रुग्णांना उपचार देण्यासोबतच त्यांनी लॉकडाऊनमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबांनाही मदत केली.

  • उपोषणाने सरकार हादरले -

अमित पालेकर पूर्वी गोव्यात खूप चर्चेत होते. जुने गोवा हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीरपणे बांधण्यात येत असलेल्या बंगल्याविरोधात त्यांनी उपोषण केले. त्यांच्या या कारवाईने गोवा सरकारलाही धक्का बसला. सरकारला त्यांच्यापुढे झुकून वादग्रस्त रचनेवर कारवाई करावी लागली. अमितच्या उपोषणादरम्यान अरविंद केजरीवाल स्वतः त्यांना भेटायला आले होते.

  • सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रतिमा -

अमित पालेकर सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहेत, गोव्यातील लोक त्यांच्यासारखेच आहेत. गरजूंच्या मदतीसाठी ते पुढे राहतात, याशिवाय भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. पालेकर दीर्घकाळापासून सांताक्रूझ परिसरात सक्रिय आहेत, जिथे त्यांची आई दहा वर्षांपासून सरपंच आहे.

हेही वाचा - Goa Assembly Election : 'आप'कडून अमित पालेकर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

Last Updated : Jan 19, 2022, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.