ETV Bharat / city

Goa Election Result 2022 : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत विजयी, गोव्यात भाजपा सत्ता स्थापनेसाठी दावा करणार

author img

By

Published : Mar 10, 2022, 6:47 AM IST

Updated : Mar 10, 2022, 10:44 PM IST

गोवा विधानसभा निवडणूक
गोवा विधानसभा निवडणूक

15:40 March 10

गोव्यात टीएमसीने पराभव स्वीकारला

गोवा टीएमसी नेत्यांनी म्हटले आहे की, आम्ही हा आदेश नम्रतेने स्वीकारतो. प्रत्येक गोंयकरांचा विश्वास आणि प्रेम जिंकण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू. कितीही वेळ लागला तरी आम्ही इथेच राहू आणि गोव्यातील जनतेची सेवा करत राहू.

15:09 March 10

वाचा कोण जिंकले कोण हारले...

1) हळदोणे मतदारसंघ

ग्लेन टिकलो (भाजपा) विजयी

कार्लोस फरेरा (काँग्रेस) पराभूत

2) बाणावली

व्हेन्झी व्हिएगस (आप) विजयी

टोनी डायस (काँग्रेस) पराभूत

चर्चिल आलेमाव (तृणमूल ) परभूत

3) डिचोली

चंद्रकांत सावळ (अपक्ष) विजयी

नरेश सावळ (मगो) पराभूत

राजेश पाटणेकर (भाजपा) पराभूत

4) कळंगुट

मायकल लोबो (काँग्रेस) विजयी

जोसेफ सिक्वेरा (भाजपा) पराभूत

5) काणकोण

रमेश तवडकर (भाजपा) विजयी

जनार्दन भंडारी (काँग्रेस) पराभूत

इजिदोर फर्नांडिस (अपक्ष)

6) कुठ्ठाळी मतदारसंघ

गिरीश पिल्लई (अपक्ष) विजयी

आंतोनियो वाझ (अपक्ष) पराभूत

गिल्बर्ट रॉड्रिग्स (तृणमूल)

7) कुंभारजुवे मतदारसंघ

राजेश फळदेसाई (काँग्रेस) विजयी

रोहन हरमलकर (अपक्ष)

8) कुंकळ्ळी

युरी आलेमाव (काँग्रेस) विजयी

क्लाफास डायस (भाजपा)

विल्सन कार्दोझ (रिव्होल्युशनरी गोवन्स)

9) कुडचडे

नीलेश काब्राल (भाजपा) विजयी

अमित पाटकर (काँग्रेस)

10) कुडतरी

आलेक्स रेजिनाल्डा लॉरेन्स (अपक्ष) विजयी

रुबर्ट परेरा (रिव्होल्युशनरी गोवन्स)

डॉमनिक गावकर (आप)

11) दाबोळी

माविन गुदिन्हो (भाजपा) विजयी

कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस (काँग्रेस)

12) फातोर्डा

विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) विजयी

दामू नाईक (भाजपा)

13) मये

प्रेमेंद्र शेट (भाजपा) विजयी

संतोष सावंत (गोवा फॉरवर्ड)

14) मांद्रे

जीत आरोलकर (मगो) विजयी

दयानंद सोपटे (भाजपा)

लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष)

15) म्हापसा

जोशुआ डिसोझा (भाजपा) विजयी

सुधीर कांदोळकर (काँग्रेस )

16) मडकई

रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर (मगो) विजयी

प्रेमानंद गावडे (रिव्होल्युशनरी गोवन्स)

सुदेश भिंगी (भाजपा)

17) मडगाव

दिगंबर कामत (काँग्रेस) विजयी

मनोहर (बाबू) आजगावकर (भाजपा)

18) मुरगाव

संकल्प आमोणकर (काँग्रेस) विजयी

मिलिंद नाईक (भाजपा) पराभूत

19) नावेली

आवेर्तान फुर्तादो (काँग्रेस) विजयी

वालंका आलेमाव (तृणमूल)

प्रतिमा कुतिन्हो (आप)

20) नुवे

आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस) विजयी

अरविंद डिकॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स)

21) पणजी

आतानासियो (बाबूश) मोन्सेरात (भाजपा) विजयी

उत्पल पर्रीकर (अपक्ष)

एल्विस गोम्स (काँग्रेस)

22) पेडणे

प्रवीण आर्लेकर (भाजपा) विजयी

राजन कोरगावकर (मगो)

23) फोंडा

केतन भाटीकर (मगो) विजयी

राजेश वेरेकर (काँग्रेस)

रवी नाईक (भाजपा)

24) पर्ये

दिव्या राणे (भाजपा) विजयी

विश्वजीत कृ. राणे (आप)

25) पर्वरी

रोहन खंवटे (भाजपा) विजयी

संदीप वझरकर (तृणमूल)

26) प्रियोळ

पांडुरंग (दीपक) ढवळीकर (मगो) विजयी

गोविंद गावडे (भाजपा)

27) केपे

- एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस) विजयी

- चंद्रकांत (बाबू) कवळेकर (भाजपा)

28) साळगाव

केदार नाईक (काँग्रेस) विजयी

जयेश साळगावकर (भाजपा)

29) सांगे

सुभाष फळदेसाई (भाजपा) विजयी

सावित्री कवळेकर (अपक्ष)

प्रसाद गावकर (काँग्रेस)

30) सांकेलीम

डॉ. प्रमोद सावंत (भाजपा) विजयी

धर्मेश सगलानी (काँग्रेस)

31) सावर्डे

गणेश गावकर (भाजपा) विजयी

दीपक प्रभू पाऊसकर (अपक्ष)

विनायक गावस (मगो)

32) शिवोली

दिलायला लोबो (काँग्रेस) विजयी

दयानंद मांद्रेकर (भाजपा)

33) शिरोडा

सुभाष शिरोडकर (भाजपा) विजयी

महादेव नाईक (आप)

34) सांत आंद्रे

वीरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स) विजयी

फ्रान्सिस सिल्वेरा (भाजपा)

35) सांताक्रूझ

रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस) विजयी

अंतोनियो फर्नांडिस (भाजपा)

अमित पालेकर (आप)

36) ताळगाव

जेनिफर मोन्सेरात (भाजपा) विजयी

टोनी रॉड्रिग्स (काँग्रेस)

37) थिवी

नीळकंठ हळर्णकर (भाजपा) विजयी

कविता कांदोळकर (तृणमूल)

38) वाळपई

विश्वजीत राणे (भाजपा) विजयी

तुकाराम (मनोज) परब (रिव्होल्युशनरी गोवन्स)

39) वास्को

कृष्णा (दाजी) साळकर (भाजपा) विजयी

कार्लुस आल्मेदा (काँग्रेस)

40) वेळ्ळी

क्रूझ सिल्वा (आप) विजयी

सावियो डिसिल्वा (काँग्रेस)

14:59 March 10

प्रिओळ - गोविंद गावडे (भाजप)

फोंडा - रवी नाईक (भाजप)

शिरोडा - सुभाष शिरोडकर (भाजप)

मरकेम - रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष)

मुरमॉगाव - संकल्प अमोनकर (काँग्रेस)

वास्को द गामा - कृष्णा सालकर (भाजप)

दाबोलिम - मौविन गुदीनो (भाजप)

कार्तालिम - अँतोनियो वास (अपक्ष)

नुवेम - अँलेक्सीओ सेक्युरा (काँग्रेस)

कुर्तारिम : आलेक्स रेजिनाल्ड (अपक्ष)

फातोर्डा - विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)

मडगाव - दिगंबर कामत (काँग्रेस)

बेनॉलिम - वेंझी वेगास (आम आदमी पार्टी)

नेवालीम - उल्हास तुयेकर (भाजप)

कुंकोलिम - अँलीमा युरी (काँग्रेस)

वेलीम - क्रूझ सिल्वा (आम आदमी पार्टी)

केपे - अल्टोन डीकोस्टा (काँग्रेस)

कुडचडे - निलेश काब्राल (भाजप)

सावर्डे - गणेश गावकर (भाजप)

सांगे - सुभाष फळ देसाई (भाजप)

काणकोण - रमेश तवडकर (भाजप)

14:59 March 10

गोवा विधानसभान निवडणूक निकाल

भाजपा : 20

काँग्रेस : 11

आयएनडी: 3

एमजीपी: 2

आप : 2

आरजी : 1

जीएफपी : 1

14:40 March 10

उत्तर गोव्यातील जिंकलेले उमेदवार

  • मांद्रे - जीत आरोलकर - मगोपा
  • पेडणे - प्रवीण आर्लेकर - भाजपा
  • डिचोली - डॉ. चंद्रकांत शेट्ये - अपक्ष
  • थिवी - निळकंठ हळर्णकर - भाजपा
  • म्हापसा - ज्योसुआ डिसोझा - भाजपा
  • शिवोली - डिलायल लोबो - काँग्रेस
  • साळगांव - केदार नाईक - काँग्रेस
  • कळंगुट - मायकल लोबो - काँग्रेस
  • पर्वरी - रोहन खंवटे - भाजपा
  • हळदोणे - कार्लोस फेरेरा - काँग्रेस
  • पणजी - बाबूश उर्फ आतानासियो मोन्सेरात - भाजपा
  • ताळगाव - जेनिफर मोन्सेरात - भाजपा
  • सांताक्रूझ - रुडॉल्फ फर्नांडिस - काँग्रेस
  • सांत आंद्रे - विरेश बोरकर - आरजी
  • कुंभारजुवा - राजेश फळदेसाई - काँग्रेस
  • मये - प्रेमेंद्र शेट - भाजपा
  • सांखळी - डॉ. प्रमोद सावंत - भाजपा
  • पर्ये - देविया उर्फ दिव्या राणे - भाजपा
  • वाळपई - विश्वजित राणे - भाजपा

14:39 March 10

मगोचे मांद्रे मतदारसंघाचे उमेदवार जीत आरोलकर यांनी विजय प्राप्त केला आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व भाजपा उमेदवार दयानंद सोपटे यांचा पराजय झाला आहे. काँग्रेस उमेदवार केदार नाईक साळगाव मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजपा उमेदवार जयेश साळगावकरांचा अनपेक्षितरित्या पराभव. भाजपा उमेदवार रवी नाईक फोंड्यातून विजयाच्या वाटेवर आहेत.

14:39 March 10

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रीया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात विजयी झालेल्या आप उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी आप उमेदवार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास आणि इंजीर क्रूझ सिल्वा यांचे अभिनंदन केले ज्यांनी बाणावली आणि वेळी मधून त्यांच्या जागा जिंकल्या. "आप'ने गोव्यात दोन जागा जिंकल्या. कॅप्टन वेंझी आणि एर क्रूझ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. ही गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे," असे त्यांनी ट्विट केले.

13:23 March 10

मुख्यमंत्री विजयी होताच कोल्हापूरकरांचा गोव्यातच जल्लोष

गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी झाल्यानंतर त्यांच्या कोल्हापूरातील सहकर्यांनी गोवा येथे जल्लोष केला. यामध्ये डॉ शिवराज देसाई, डॉ तोडकर,डॉ शिरीष पाटील ,डॉ राजेश कुंभोजकर,डॉ शीतल पाटील,डॉ सुनील कदम ,डॉ अभिजित राऊत,डॉ मिलिंद वाली, डॉ अभय लुनावत, डॉ सुजय घाटगे,डॉ शरद पाटील यांनी सावंत यांचे अभिनंदन करून त्याच्या निवासस्थानी एकच जल्लोष कोल्हापूर पद्धतीने केला.

13:17 March 10

गोवा अपक्ष विजयी डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विजयी होताच भाजपला पाठिंबा जाहीर केला. तसेच काँग्रेसचे उमेदवार असलेले मायकल लोबो यांनी विजय प्राप्त केला आहे.

12:58 March 10

दाबोली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोविन गुदीनो विजयी

12:50 March 10

गोव्यात भाजपा सत्ता स्थापनेसाठी दावा करणार

12:49 March 10

भाजप मधील नेत्यांनी मदत केली नाही, असा गंभीर आरोप पणजीचे भाजपा विजयी उमेदवार बाबुश मोन्सरात यांनी केला आहे. वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याची बाबुश मोन्सरात आणि भाजपाच्या तालिगावमधील विजयी उमेदवार जेनिफर मोन्सरात यांनी माहिती दिली.

12:40 March 10

राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत.

12:29 March 10

  • मुख्यमंत्री डॉ सावंत विजयी
  • थिवी मतदार संघातून भाजप उमेदवार नीळकंठ हळर्णकर 2018 मतांनी विजयी.
  • भाजपा वाळपाई मतदार संघाचे उमेदवार विश्‍वजित राणे हे 8300 मतांनी विजयी.
  • फातोर्डा मतदारसंघाचे गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई यांचा विजय. 1300 मतांची आघाडी

12:27 March 10

गोवेकरांनी तृणमूलवर दाखवला अविश्वास

गोवा विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या ताज्या कलानुसार , भाजपा एक मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. 40 जागांच्या विधानसभेत भाजप 18 जागांवर, काँग्रेस 12 जागांवर, AAP एका जागेवर, TMC 4 जागांवर आणि इतर 4 जागांवर आघाडीवर होते. तृणमूल काँग्रेसने गोव्यात पाय रोवून एक वर्षाहून कमी काळ लोटला आहे. असे असूनही, तृणमूलने गोवा विधानसभा निवडणूक एमजीपीसोबत युती करून लढवली आणि सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये 4 जागांवर आघाडीवर होते. टीएमसीच्या सरचिटणीस ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या गोव्यात असून गोव्यातील निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून आहेत. मात्र आता TMCच्या हातून सगळ्या जागा निसटतांना दिसत आहे.

12:09 March 10

Bjp 19

काँग्रेस गोवा फॉरवर्ड - 12

टीएमसी - 3

आप - 2

Rg - 1

12:04 March 10

मडगावमधून मनोहर आजगावकर पराभूत झाले आहेत. केपेतुन बाबू कवळेकर पराभूत झाले आहेत.

12:00 March 10

सावर्डे मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गणेश गावकर मोठ्या मतांनी विजयी त्यांच्या विरोधात अपक्षा दीपक पावसकर पराभूत

12:00 March 10

प्रवीण आरलेकर विजयी

11:35 March 10

उत्पल पर्रीकर यांचा पराभव

पणजीतून अपक्ष उत्पल पर्रीकर 800 मतांनी पिछाडीवर

जवळपास उत्पल पर्रीकर यांचा पराभव निश्चित

भाजपाचे बाबुश मोन्सरात विजयाच्या जवळ

उत्पल पर्रीकर यांनी मतमोजणी केंद्र सोडले

11:31 March 10

मी माझा पराभव मान्य करतो, मी शेवटपर्यंत लढलो - उत्पल पर्रीकर

11:26 March 10

काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांच्या सहकार्यामुळे माझा विजय - दिव्या राणे

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सुनबाई भाजपा उमेदवार डॉ दिव्या राणे यांनी आपल्या विजयाचे श्रेय प्रतापसिंह राणे यांना दिले आहे. डॉ दिव्या राणे या काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांच्या पारंपरिक वाळपाई मतदार संघातून निवडून आल्या आहेत.

11:18 March 10

वाळपई मधून भाजपचे विश्वजित राणे विजयी तर पर्यें मधून भाजपाच्या दिव्या राणे विजयी झाल्या आहेत. यासोबतच मडगावमधून काँग्रेसचे दिगंबर कामत विजयी झाले आहेत. भाजपाचे उपमुख्यमंत्री मनोहर(बाबू) आजगावकर यांचा दिगंबर कामत यांनी पराभव केला आहे.

10:49 March 10

मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर मोठ्या मतांनी पिछाडीवर आहेत.

10:47 March 10

गोव्यात भाजपा आघाडीवर

गोव्यात भाजपाने आघाडी कायम राखली आहे. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पराजयाच्या सावटाखाली आहेत. कळंगुटचे काँग्रेस उमेदवार मायकल लोबी हे 1907 मतांनी आघाडीवर आहेत. तर वाळपई मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे हे 5000 मतांनी पुढे आहेत. तर दिव्या राणे या पर्ये मतदारसंघातून 8000 मतांनी आघाडीवर आहेत.

10:38 March 10

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत पराभवाच्या छायेत

पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात 334 मतांनी आघाडीवर

फोंडयातून केतन भाटीकर 131 मतांनी आघाडीवर

रुडॉल्फ फर्नांडिस सांताक्रुज मतदारसंघातून 1144 मतांनी पुढे आहेत.

10:34 March 10

10:20 March 10

भाजपाचे बाबुश मोन्सरात यांना 2981 मते

अपक्ष उत्पल पर्रीकर यांना 2647 इतकी मते

10:16 March 10

प्रमोद सावंत 140 मतांनी आघाडीवर आहेत.

10:05 March 10

मडगाव विधानसभा मतदारसंघातील स्थिती

काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत हे 2888 मतांनी आघाडीवर तर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर पिछाडीवर आहेत.

09:51 March 10

आघाडी 27/40

भाजपा -16(+5)

काँग्रेस - 5(-9)

आप - 2 (+2)

टीएमसी- 1, OTH - 3(+1)

09:50 March 10

गोव्यात शिवसेनेचा फ्लॉप शो

राज्यात झालेल्या मतमोजणीत शिवसेना कुठेही दिसत नसल्याने, गोव्यात शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याच्या चर्चा सगळीकडे होत आहेत.

09:50 March 10

पर्वरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार रोहन खवंटे आघाडीवर आहेत, तर नीलेश काब्राल कुडचडे मतदारसंघात आघाडीवर आहेत.

09:50 March 10

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर झळकले कॉंग्रेस नेते

गोवा विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी आहे. जनता कुणाला कौल देणार हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर 8 मार्च रोजी कॉंग्रेसचे काही नेते झळकले. हा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला उधाण आले.

09:48 March 10

मडकई मतदारसंघातून मगोचे सुदिन ढवळीकर आघडीवर

मुरगाव काँग्रेस संकल्प आमोणकर 60 मतांनी आघाडीवर

कानकोन मतदारसंघातून काँग्रेसचे जनार्धन भंडारी आघाडीवर

09:42 March 10

कुणाला पाठिंबा द्यायचा हे निकालानंतर ठरवणार : सुदिन ढवळीकर

गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहे. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किंगमेकर ठरणार आहे. मात्र, अद्याप मगोपने कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. निकालानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मगोप नेते सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.

09:38 March 10

  • मडकई मतदारसंघातून मगोचे सुदिन ढवळीकर आघाडीवर आहेत.
  • मुरगाव काँग्रेस संकल्प आमोणकर 60 मतांनी आघाडीवर आहेत.
  • कानकोन मतदारसंघातून काँग्रेसचे जनार्धन भंडारी आघाडीवर आहेत.
  • शिवोलो दयानंद 65 मतांनी आघाडीवर आहेत.

09:36 March 10

उत्तर गोव्यातून भाजपा 10 जागांवर आघाडीवर

09:36 March 10

मोंसरात दाम्पत्य आघाडीवर

09:35 March 10

विश्वजित राणे आणि दिव्या राणे ही जोडी आघाडीवर आहे.

09:34 March 10

शिवोली दयानंद मांद्रेकर 122 मतांनी आघाडीवर आहेत.

09:33 March 10

कॅप्‍टन विरीएटो हिपोलिटो मेन्डोन्सा फर्नाडीस देबोलीम मतदारसंघातून आघाडीवर

09:31 March 10

नवेली आपच्या प्रतिमा कुटीनहो आघाडीवर आहेत.

09:30 March 10

भाजपा 17 आणि काँग्रेस 18 तर टीएमसी 4 जागांवर आघाडीवर

09:30 March 10

प्रियोळ मतदारसंघातून MGP चे पांडुरंग उर्फ दीपक ढवळीकर मोठ्या मतांनी आघाडीवर

09:27 March 10

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आघाडीवरील उमेदवार

ताळगाव : जेनिफर मोन्सेरात

पणजी: बाबूश मोन्सेरात

साळगाव : जयेश साळगावकर

साखळी: धर्मेश सगलानी

थिवी: नीळकंठ हळर्णकर

म्हापसा: ज्योशुआ डिसोझा

हळदोणा: ग्लेन टिकलो

सांत आंद्रे: वीरेश बोरकर

सांताक्रुझ : रुडॉल्फ

शिवोली: दयानंद मांद्रेकर

मये : प्रेमेंद्र शेट

पेडणे: राजन कोरगावकर

मांद्रे :जीत आरोलकर

डिचोली: चंद्रकांत शेट्ये

कुंभारजुवे :राजेश फळदेसाई

वाळपई: विश्वजीत राणे

पर्ये: दिव्या राणे

09:26 March 10

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 436 मतांनी पिछाडीवर. काँग्रेसचे धर्मेश सगलानी आघाडीवर आहेत. तर डिचोलीत नरेश सावळ व डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यात चढाओढ दिसून येत आहे. हळदोण्यात भाजपाचे ग्लेन टिकलो आघाडीवर आहेत.

09:24 March 10

गोव्यात काँग्रेस 18 जागांवर तर भाजपा 17 जागांवर आघाडीवर आहे.

गोव्यात काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. येथे तृणमूल 4 जागांवर आघाडीवर आहे.

09:22 March 10

एकूण 11 जणांचे निकाल मिळायला सुरुवात झाली आहे.

भारतीय जनता पार्टी 7 जागांवर आघाडीवर

काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर

अपक्ष - 2 जागांवर आघाडीवर

09:21 March 10

उत्पल पर्रीकर 784 मते तर बाबूश मोन्सेरात 1167 मते

पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात 1167, उत्पल पर्रीकर 784 तर एल्विस गोम्स 343 मते मिळाली आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीवरून भाजपा दोन मतदारसंघात आघाडीवर आहे.

09:16 March 10

प्रमोद सावंत 600 मतांनी पिछाडीवर आहेत.

  • शिवोली मतदार संघातून दयानंद मांद्रेकर आघाडीवर आहेत.
  • अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड कुडतरी मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
  • बाबूश मोन्सेरात यांची पत्नी ताळगाव येथून जेनिफर मोन्सेरात यादेखील आघाडीवर आहेत.

09:15 March 10

गोव्यातील नुकत्याच हाती आलेल्या माहिती नूसार, टीएमसी 4 जागांवर आघाडीवर आहे.

09:11 March 10

धर्मेश सग्लानी 600 मतांनी आघाडीवर

09:10 March 10

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पिछाडीवर

मतमोजणीनंतर भाजपची बैठक

भाजपा मुख्यालयात बोलवली उमेदवारांची बैठक

सायंकाळी चार वाजता पणजीतील भाजप मुख्यालयात होणार बैठक

09:07 March 10

बाबुश मोन्सेरात 383 मतांनी आघाडीवर

09:05 March 10

गोवा काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपालांकडे मागितली

गोव्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडीला वेग आला आहे. सरकार स्थापनेसाठी काँग्रेसची धडपड दिसून येत आहे. गोवा काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी दुपारी तीन वाजताची वेळ राज्यापलांकडे मगितल्याची माहिती आहे.

08:59 March 10

टीएमसी 4 जागांवर आघाडीवर

गोव्यातील सर्व जागांवर ट्रेंड आले आहेत. येथे काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, गोव्यात टीएमसी किंगमेकर असल्याचे सिद्ध होऊ शकते. येथे टीएमसी 4 जागांवर आघाडीवर आहे.

08:57 March 10

भाजपाचे विश्‍वजित राणे आणि दिव्या राणे आघाडीवर

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वाळपईमधून भाजपाचे विश्‍वजित राणे हे 1300 मताने तर पर्येमधून दिव्या राणे या 2600 मताने आघाडीवर आहेत. पहिल्या टप्प्यात वाळपईमधून विश्‍वजित राणे हे 1300 मताने तर पर्यायांमधून दिव्या राणे या 2600 मताने आघाडीवर आहेत.

08:49 March 10

गोव्यात काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे.

08:41 March 10

तृणमूल शिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते चर्चिल आलेमाव यांनी केला आहे.

08:41 March 10

गोव्यात भाजपा सहा जागांवर तर काँग्रेस पाच जागांवर पुढे

08:33 March 10

निवडून आल्यास राज्याच्या हितासाठी भाजपसोबत जाईन - पार्सेकर

मांद्रे मतदार संघातून ( Mandre Constituency ) अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक ( Goa Election 2022 ) लढवत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी निवडून आल्यास भाजपासोबत जाईल असे म्हटलं आहे.

08:31 March 10

तृणमूल, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एकत्र निर्णय घेणार

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार आहे. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी माहिती दिली आहे. तृणमूलचे अभिजित बॅनर्जी गोव्यात आलेत त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मगोला 9 जागा मिळणार असल्याचा ढळीकरांना विश्वास व्यक्त केला आहे.

08:22 March 10

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत मतमोजणी केंद्रात दाखल झाले आहेत. डॉक्टर प्रमोद सावंत हे सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत

08:19 March 10

गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतले.

07:41 March 10

मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरुम केल्या ओपन

  • Goa | The strong rooms have just been opened in the presence of candidates&observers. Postal ballots will be taken to the counting halls through a dedicated corridor of security personnel. Counting for South Goa will be done at Damodar College: Collector Ruchika Katiyal pic.twitter.com/APJLOv1U6Z

    — ANI (@ANI) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उमेदवार आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. पोस्टल मतपत्रिका सुरक्षा कर्मचार्‍यांच्या समर्पित कॉरिडॉरमधून मतमोजणी हॉलमध्ये नेल्या जातील. दक्षिण गोव्याची मतमोजणी दामोदर कॉलेजमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचिका कटियाल यांनी दिली.

07:13 March 10

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे.

06:37 March 10

Goa Election Result 2022 : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत विजयी, गोव्यात भाजपा सत्ता स्थापनेसाठी दावा करणार

गोवा (पणजी) - गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान ( Goa Election 2022 ) झाले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभेचा कार्यकाळ हा 15 मार्चला संपत आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार ( Who Will Become Next CM Of Goa ) स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्च म्हणजे आज कळणार आहे. त्यामुळे भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भापजाला यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय.

त्रिशंकू -

प्रादेशिक पक्षांच्या दमदार कामगिरीमुळे गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. 1999 आणि 2012 विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद आहेत. 1999 मध्ये काँग्रेसला 21 तर भाजपाला 2012 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली आहेत. यंदाही गोव्यात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष -

गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण सरकार स्थापन करण्यास भाजपा यशस्वी झाले. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, पर्रीकर यांना कर्करोगासारख्या आजाराने ग्रासले, तरीही त्यांचे निधन होईपर्यंत म्हणजे 17 मार्च 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि भाजपा सध्या त्यांच्याबरोबर निवडणूक लढत आहे.

काँग्रेसची सावध भूमिका -

निकालापूर्वीच काँग्रेसने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने महत्त्वाच्या नेत्यांना निवडणूक राज्यांमध्ये पाठवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही आठवड्यांपूर्वी यासंदर्भात बैठक घेतली होती. काँग्रेसने खबरदारी म्हणून आपल्या उमेदवारांना सुरक्षित गोव्यातील बीच रिसॉर्टमध्ये हलवले आहे.

गोव्यातील मतदानाची टक्केवारी -

गोव्यात 40 विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानात 78.94 टक्के ( Goa Voting Percentage ) इतके उच्च मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी उत्तर गोव्यातील सांखलीम मतदारसंघात सर्वाधिक 89.61 टक्के मतदान झाले, तर दक्षिण गोव्यातील बेनौलीम येथे सर्वात कमी 70.20 टक्के मतदान झाले. एकूण 301 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महिला मतदार गोव्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. निवडणूक आयोगानुसार, गोव्यात एकूण 11,56,460 मतदार आहेत ज्यात 5,93,960 महिला आणि 5,62,500 पुरुष मतदार आहेत. पुरुषांपेक्षा 31,460 महिला मतदार जास्त आहेत. असे असूनही, फार कमी महिलांना ( Goa Female Voters ) राजकीय पक्षांनी उमेदवार म्हणून उभे केले आहे.

ख्रिश्चन लोकसंख्या -

गोव्यात 33% ख्रिश्चन लोकसंख्या आहे. 40 पैकी 15 मतदारसंघांमध्ये ख्रिश्चनांचा मोठा प्रभाव आहे. गोव्यातील तळेगाव, कुंकोली, नावेली, नुवेम, कलंगुट, आंद्रे, वेलीम, अल्दोना, दाभोली, सेंटक्रूझ, कर्टोरी, सिलीम, कुरचेड, बेनोली आणि फरतोडा येथे ख्रिश्चन मतदारांचा मोठा प्रभाव आहे.

भंडारी समाजाचे प्राबल्य -

गोव्यातील 18 मतदारसंघांवर ओबीसी समाजातील भंडारी या जातीचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. हीच बाब हेरून आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून नवीन गणित मांडली. गोव्यातील मांद्रे, शिरोडा, शिवोली, पोंडा, सालेगाव, मार्मुगोवा, दाभोली, म्हापसा, तालेगाव,मये,वापई, कांडकोर, मडकई, सांगेई, कुठाळी, पेडणे,सावर्डे आणि कुरचडे या मतदारसंघांमध्ये भंडारी समाजाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघांमधून जर भंडारी समाजाच्या उमेदवारांचा विजय झाला तर मुख्यमंत्रीपदासाठी आणि एकूणच सत्ता काबीज करण्यासाठी भंडारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची संख्या -

काँग्रेसने37 उमेदवार उभे केले आणि त्याचा मित्र GFP (गोवा फॉरवर्ड पार्टी) 3 मतदारसंघात, तर भाजपा सर्व 40 जागांवर निवडणूक लढवत आहे. आप ने 39 जागा लढवल्या आहेत. TMC ने 26 तर MGP (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी) 13 जागा लढवत आहेत. तसेच 68 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

उमेदवारांनी घेतली शपथ -

गोव्यातील आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी शपथपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी राज्यातील मतदारांप्रती निष्ठेची शपथ दिली. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सर्व 36 उमेदवारांनी मंदिर, चर्च आणि मशीद या तीन धार्मिक संस्थांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे वचन दिले आहे. महालक्ष्मी मंदिर आणि बांबोलीम क्रॉस चर्च आणि नंतर बेटीम येथील हमजा शाह दर्गा येथे पुजाऱ्यांनी उमेदवारांना शपथ दिली.

पक्षांतर आणि लढत -

2017 साली 40 पैकी सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस राज्यातील पहिला पक्ष ठरला होता. मात्र अंतर्गत वादामुळे बहुमताच्या आकड्यांचा खेळ न जुळवता आल्यामुळे काँग्रेस पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. जुलै 2019 मध्ये, विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील काँग्रेसच्या 10 आमदारांचा गट सत्ताधारी भाजपामध्ये विलीन झाला होता. या 10 मधील 7 बंडखोर आमदार यंदा भाजपाच्या तिकिटावर 2022 ची निवडणूक लढवत आहेत. तर दोन अपक्ष आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आहे. काँग्रेला रामराम ठोकत भाजपात चंद्रकांत कवळेकर (क्यूपेम, भाजपा), फिलीप नेरी रॉड्रिग्ज (वेलीम, राष्ट्रवादी), जेनिफर मोन्सेरात (तलेगाव, भाजपा), इजिदोर फर्नांडिस (कानाकोना, आयएनडी), निळकंठ हळर्णकर(तिविम, भाजप), बाबूश मोन्सेराते (भाजपा), अन्टोनी फर्नांडिस (सेंट क्रूज, भाजपा), फ्रान्सिस सिल्वेरा (सेंट आंद्रे, भाजपा), विल्फ्रेड (नुवेम, IND) आणि क्लाफास डायस (कंकोलिम, भाजपा) या 10 आमदारांनी प्रवेश केला होता.

प्रमुख उमेदवार -

प्रमोद सावंत (पक्ष- भाजपा, मतदारसंघ- सांकेलीम)

दिगंबर कामत (पक्ष- काँग्रेस, मतदारसंघ- मडगाव)

लक्ष्मीकांत पार्सेकर (पक्ष- अपक्ष, मतदारसंघ- मंद्रेम)

उत्पल पर्रीकर (पक्ष- अपक्ष, मंथरेम)

लोबो (पक्ष- काँग्रेस, मतदारसंघ- कळंगुट)

दयानंद मांद्रेकर (पक्ष- भाजपा, मतदारसंघ- सिओलिम)

चर्चिल आलेमाओ (पक्ष- टीएमसी, मतदारसंघ- बेनौलिम)

विजय सरदेसाई (पक्ष- जीएफपी, मतदारसंघ- फातोर्डा)

अतानरातेस (पार्टी- जीएफपी, मतदारसंघ- फातोर्डा)

बाबूश मोन्सेरात (पक्ष- भाजपा, मतदारसंघ- पणजी)

विश्वजित राणे (पक्ष- भाजपा, मतदारसंघ- वाळपोई)

अमित पालेकर (पक्ष- आप, मतदारसंघ- सेंट क्रूझ).

मनोहर आजगावकर (पक्ष- भाजपा, मतदारसंघ- मडगाव)

मिलिंद नाईक (पक्ष- भाजपा, मतदारसंघ- मुरगाव)

हेही वाचा - UP Election Result 2022 : यूपीचा कौल कुणाला? मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

Last Updated :Mar 10, 2022, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.