ETV Bharat / city

Goa BJP claim to form Government : गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपचा दावा; राज्यपालांची घेतली भेट

author img

By

Published : Mar 21, 2022, 4:22 PM IST

Updated : Mar 21, 2022, 8:53 PM IST

goa bjp
भाजपने गोवा राज्यपालांची भेट घेतली

गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant Goa CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच भाजपने गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेत सत्ता स्फानेसाठी दावा (BJP claim to form Government in Goa) केला आहे. यावेळी त्यांनी 25 आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना सोपवले असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजी - गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant Goa CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आमदार व केंद्रीय निरीक्षकांची महत्वाची बैठक आज पणजीत झाली. या बैठकीत प्रमोद सावंत हेच गोव्याचे मुख्यमंत्री असतील यावर एकमत झाले आहे. त्यानंतर लगेच भाजपने गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेत सत्ता स्फानेसाठी दावा (BJP claim to form Government in Goa) केला आहे. यावेळी त्यांनी 25 आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना सोपवले असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

प्रमोद सावंत - काळजीवाहू मुख्यमंत्री, गोवा

आता भाजप (BJP Goa) गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा (BJP claim to form government Goa) करणार आहे.

  • आज करणार सत्ता स्थापनेचा दावा -

भाजप आपल्या तीन अपक्षांच्या मदतीने राज्यपाल श्रीधरण पिल्लई यांची भेट भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, एल मुरुगण, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी टी रवी, प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच भाजपचे सर्व आमदार व तिन्ही अपक्ष उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी भाजप शिष्टमंडळाला शपथविधीसाठीची तारीख निश्चित करण्यास सांगितले आहे.

गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपचा राज्यपालांकडे दावा
  • कोण आहेत प्रमोद सावंत?

प्रमोद सावंत हे दोन वेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. पक्ष संघटनेतून पुढे आलेल्या सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. प्रमोद सावतं हेच गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. सावंत यांना सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री पद सांभाळता येणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी 'प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री असतील' अशी घोषणा केली.

  • Goa CM-designate Pramod Sawant and other BJP leaders & MGP MLAs meet Governor PS Sreedharan Pillai and stake claim to form the Government in the state. pic.twitter.com/Oht0cmfhx5

    — ANI (@ANI) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. त्यांनी कोल्हापूरमधून 'बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसिन, सर्जरी' ही पदवी संपादन केली. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून 'मास्टर ऑफ सोशल वर्क' ही पदवी मिळवली.

2012 मध्ये प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातून निवडून येत गोवा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते पुन्हा एकदा विजयी झाले. सध्याच्या विधानसभेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रमोद सावंत यांना आरएसएसची पार्श्वभूमी लाभली आहे. सावंत हे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षही होते. त्यामुळे पक्षाचा एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Last Updated :Mar 21, 2022, 8:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.