ETV Bharat / city

पेट्रोलपंप चालकांकडून आदेशाचे उल्लंघन, पोलीस आयुक्तांनी दिला 'हा 'इशारा

author img

By

Published : Oct 27, 2021, 5:31 PM IST

नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील मालेगाव स्टँडवरील एन. एल. गांधी, पी. जी. पालिजा, एच. पी. पेट्रोल पंप आणि खालसा ऑटो सर्व्हिस या तीनही पंप चालकांना पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या सूचनेनुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी नोटीस जारी केल्या आहेत.

नाशिक पेट्रोलपंप
नाशिक पेट्रोलपंप

नाशिक - शहरात सुरू असलेल्या नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेसाठी काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शहरातील तीन पेट्रोलपंप चालकांना पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पेट्रोलपंपाचा ना हरकत दाखला रद्द का करू नये, अशाप्रकारे कारणे दाखवा नोटीस जारी केल्या आहेत. त्यामुळे मालेगाव स्टँडवर रांगेत असलेल्या तिन्ही पेट्रोलपंपाच्या एनओसी रद्द होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

4 पंपांचा समावेश

नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील मालेगाव स्टँडवरील एन. एल. गांधी, पी. जी. पालिजा, एच. पी. पेट्रोल पंप आणि खालसा ऑटो सर्व्हिस या तीनही पंप चालकांना पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या सूचनेनुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी नोटीस जारी केल्या आहेत.

15 ऑगस्टपासून मोहीम

नो हेल्मेट, नो पेट्रोल ही मोहीम 15 ऑगस्टपासून शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर राबवली जात आहे. यासाठी पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. या संदर्भातील अधिसूचना व त्यातील नियम जारी जाहीर केले असताना या पंपचालकांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. एका पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट चालकांना पेट्रोल दिले जात होते. तसेच दुसऱ्या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त आढळली. तिसऱ्या पेट्रोल पंपावर विविध त्रुटी आढळून आल्याने या पेट्रोलपंप चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. पेट्रोल पंप चालकांचा ना-हरकत प्रमाणपत्रे रद्द का करू नये, अशा प्रकारच्या नोटीस काढल्याने पेट्रोलपंप चालकांचे धाबे दणाणले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.