ETV Bharat / city

HSC First Paper : नाशिकमध्ये बारावीचा पहिला पेपर कॉपीमुक्त

author img

By

Published : Mar 5, 2022, 10:52 PM IST

बारावीचा पहिला पेपर आज पार पडला. काही विद्यार्थ्यांना तो अवघड गेला आहे. मात्र, नाशिकमध्ये एकाही काॅपी प्रकाराची नाेंद झाली ( No Copi Hsc First Paper ) नाही.

HSC First Paper
HSC First Paper

नाशिक - कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. इंग्रजी विषयाचा हा पहिला पेपर सराव कमी झाल्याने विद्यार्थ्यांना काहीसा अवघड गेला. असे असतानाही नाशिकमध्ये एकाही काॅपी प्रकाराची नाेंद झाली नाही. त्यामुळे हा पेपर काॅपीमुक्त झाल्याचे विभागीय शिक्षण मंडळाने स्पष्ट ( No Copi Hsc First Paper ) केले. जिल्ह्यातील ४४९ कनिष्ठ महाविद्यालय शाळातील ४२० केद्रांवर परीक्षा पार पडली. विभागातील ९६ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सीलबंद पाकीट

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दाेन वर्षांनी विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे गेले. कोरोनाच्या सावटामुळे परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंडळाने लेखी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. बारावीची लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल या कालावधीतपर्यंत चालणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात येणारे नैराश्य, दडपण दूर करण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहेत. नाशिक विभागातील धुळे येथे ७३ हजार ७७५, जळगाव येथे ४८ हजार ५०४ तर नंदुरबार येथे १६ हजार ६३३ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. ही परीक्षा यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित हाेती. प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. यंदा बाेर्डाने ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ तर, ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे जादा वेळ देण्याचे ठरवले आहे. तसेच परीक्षेदरम्यान, एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सीलबंद पाकीट देण्यात आले.

नाशिकमधील नोंदणी झालेले विद्यार्थी ( शाखानिहाय )

विज्ञान : ३१ हजार ५५८

कला : २६ हजार १७९

वाणिज्य : १३ हजार ५८०

व्यावसायिक अभ्यासक्रम : २ हजार ४२८

टेक्निकल सायन्स : ३४हेही वाचा - Pune : खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले शरद पवारांचे अनेक किस्से, पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.