ETV Bharat / city

Nashik Leopard Death : वाहनाच्या धडकेत जखमी बिबट्याचा अखेर मृत्यू

author img

By

Published : Mar 3, 2022, 3:31 PM IST

सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत वासाडी परिसरात जखमी बिबट्या पडला असतानाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्याला उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले होते. परंतु त्यांच्या उपचारादरम्यान ( Nashik Leopard Death ) मृत्यू झाला आहे.

Leopard
Leopard

नाशिक :- त्र्यंबक रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहनाच्या धडकेत एक बिबट्या बेशुद्धावस्थेत (Leopard Died after being hit by Vehicle) पडल्याचे दिसले. प्रवाशांनी या संदर्भातली माहिती तात्काळ वनविभागाला दिली. बिबट्या बेशुद्ध असल्याने त्याला बघण्यासाठी जवळ जात असताना अचानक बिबट्याने डरकाळी फोडली. त्यामुळे बिबट्याचा आवाज ऐकताच प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.

बिबट्याचा अखेर मृत्यू

जखमी अवस्थेत असलेल्या या बिबट्याचा अखेर मृत्यू झाल्याची माहिती पोलिस व वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत वासाडी परिसरात जखमी बिबट्या पडला असतानाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्याला उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले होते. परंतु त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - Sangli Leopard Death : ऊसाच्या शेतात सापडला बिबट्याचा मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.