ETV Bharat / city

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा पित्याकडून खून

author img

By

Published : Jan 4, 2021, 7:11 PM IST

Updated : Jan 4, 2021, 8:39 PM IST

रविवारी (3 जानेवारी) रात्री जमिनीवरून वडील आणि मुलात जोरदार भांडण झाले. तेव्हा प्रभाकर याने मुलाला मी तुला संपून टाकेल अशी धमकी दिली. पहाटे मुलगा निलेश झोपेत असताना 4 तारखेला  त्याचा गळा दाबून प्रभाकर याने खून केल्याचे त्याची पत्नी जयश्री यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीला नेताना पोलीस
आरोपीला नेताना पोलीस

नाशिक- विवाहबाह्य संबंधास अडसर ठरणाऱ्या मुलाचा वडिलाने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार जनरल वैद्यनगर भागात घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी प्रभाकर माळवाड याला अटक केली आहे.

संशयित आरोपीची पत्नी जयश्री प्रभाकर माळवाड यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार प्रभाकर माळवाड हा देवळा तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी म्हणून नोकरीला आहे. प्रभाकर याचे एका महिलेशी विवाह बाह्यसंबध आहे. प्रभाकर याने स्वतःच्या नावावर असलेली एक एकर जमीन कल्पना नावाच्या महिलेच्या नावावर केली. त्यामुळे प्रभाकर आणि त्यांचा मुलगा निलेश यांच्यात नेहमी वादाचे प्रसंग घडत होते. रविवारी (3 जानेवारी) रात्री जमिनीवरून वडील आणि मुलात जोरदार भांडण झाले. तेव्हा प्रभाकर याने मुलाला मी तुला संपून टाकेल अशी धमकी दिली. पहाटे मुलगा निलेश झोपेत असताना 4 तारखेला त्याचा गळा दाबून प्रभाकर याने खून केल्याचे पत्नी जयश्री यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा-राहाता तालुक्यात जमिनीच्या वादातून तरुणाची हत्या; 5 जणांना अटक

'आई मला वाचव'च्या मुलाने केल्या धावा-
संशयित आरोपीच्यी पत्नीने तक्रारीत म्हटले की, पती प्रभाकर आणि मुलगा निलेश हे एकच बेडरूममध्ये झोपले होते. पहाटे 5 वाजवून 45 मिनीटांनी बेडरूममधून मुलगा निलेश 'आई आई मला वाचव' असा आवाज आला मी. जेव्हा बेडरूममध्ये जाऊन बघितले तर धक्काच बसला. पती मुलाच्या छातीवर बसून त्याचा गळा आवळत होते. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी जोरात धक्का दिला. जीव जाईपर्यंत त्याचा गळा दाबून ठेवला. त्यानंतर प्रभाकर याने मुलाच्या गळ्याभोवती चादर गुंडाळून घरातून निघून गेल्याचे संशयिताच्या पत्नीने सांगितले.

मुलाचा पित्याकडून खून

हेही वाचा- भयंकर! १८ वर्षीय एकुलत्या एक मुलाने वडिलांचा विळ्याने कापला गळा

पोलीस निरीक्षक किशोर मोरे म्हणाले की, मृताच्या गळ्याभोवती बेडशीट आवळले होते. सुरुवातीला संशयिताच्या पत्नीने माहिती दिली नव्हती. चौकशी केली असता त्यांनी माहिती दिली. आरोपीनेही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. तक्रारदार महिला या निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक आहेत.

Last Updated : Jan 4, 2021, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.