ETV Bharat / city

Nitin Raut on Load Shedding : 22 दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही - ऊर्जामंत्री नितीन राऊत

author img

By

Published : May 13, 2022, 7:07 AM IST

Nitin Raut on Load Shedding
ऊर्जामंत्री नितीन राऊत

ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य व योग्य नियोजनामुळे महाराष्ट्रात मागील 22 दिवसापासून भारनियमन होत नसल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ( nitin raut on load shedding in nashik ) दिली.

नाशिक - जगासह भारतातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन होत असून प्रचंड तापमान व विजेची मागणी वाढली आहे. ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य व योग्य नियोजनामुळे महाराष्ट्रात मागील 22 दिवसापासून भारनियमन होत नसल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ( nitin raut on load shedding in nashik ) दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात नवीन 33/11 केव्ही डहाळेवाडी उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

उपकेंद्राचे अनावरण - दुर्गम भागात ४ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या विद्युत उपकेंद्रामुळे या भागातील ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.या उपकेंद्रामुळे वावीहर्ष, टाकेहर्ष, डहाळेवाडी, चंद्राचे मेट कळमुस्ते, अस्वलीहर्ष, दाडोशी, उमेशीमेट, बर्डेचीवाडी या आठ गावांतील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ होईल. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते विद्युत उपकेंद्रातील परिसरातील नामफलकाचे अनावरण, पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पूजन आणि आवारात वृक्षरोपण करण्यात आले.

वीज बिल भरताना दुय्यम स्थान - आज तापमानात वाढ होत असताना विजेच्या मागणीनेही उच्चांक गाठला आहे. वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा व बाजारातून रोखीने वीज विकत घ्यावी लागते.तसेच कोळसा वाहतुकीला,प्रशासकीय कामकाजाला व पगाराला दरमहा पैसे लागतात.मात्र अनेक ग्राहक इतर सेवांचे आधी पैसे मोजतात पण वीज बिल भरताना दुय्यम स्थान देतात अशी खंत डॉ राऊत यांनी व्यक्त केली.

विजेचा वापर काटकसरीने करावा - महावितरण ही वीजवितरणासोबत रात्र अन दिवस सेवा देणारी कंपनी आहे.कोरोना काळात,अतिवृष्टी व महापुरातही राज्यामध्ये अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली आहे.वीज पुरवठा करणे हे कार्य महावितरणचे असल्याने ग्राहकांनीसुद्धा आपली वीज बिले वेळेत भरून कंपनीला वीज कापण्याची संधी देऊ नये. तसेच अनेक गावामध्ये पथदिव्यांवरील दिवे दिवसा सुरु असल्यामुळे विजेचा गैरवापर होतो व अनावश्यक बिल वाढते. त्यामुळे विजेचा वापर काटकसरीने करावा,असे कळकळीचे आवाहन ऊर्जामंत्री राऊत यांनी केले.

हेही वाचा - Akbaruddin Owaisi Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसींनी माफी मागावी; चंद्रकांत खैरेंची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.