Akbaruddin Owaisi Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसींनी माफी मागावी; चंद्रकांत खैरेंची मागणी

author img

By

Published : May 12, 2022, 8:19 PM IST

Updated : May 12, 2022, 9:03 PM IST

Chandrakant Khaire

एएमआयएम ( AIMIM ) सामाजिक स्वास्थ खराब करत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी केला. मुस्लिम लोक देखील औरंगजेबाला ( Aurangzeb Grave Controversy ) मानत नाही. कोणी त्यांच्या कबरीवर जात नाही, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवले का? नाही ना, मग एमआयएमच्या नेत्यांना का जायची गरज पडते.आता अकबरुद्दीन ओवेसींनी ( MLA Akbaruddin Owaisi ) माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली.

औरंगाबाद - औरंजेबाच्या कबरी वरून पुन्हा एकदा शिवसेना आणि एमआयएम आमने समाने आली आहे. एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय होती? असा प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित करत ओवेसी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. एएमआयएम ( AIMIM ) सामाजिक स्वास्थ खराब करत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी केला. मुस्लिम लोक देखील औरंगजेबाला ( Aurangzeb Grave Controversy ) मानत नाही. कोणी त्यांच्या कबरीवर जात नाही, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवले का? नाही ना, मग एमआयएमच्या नेत्यांना का जायची गरज पडते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दोन दिवस आधी असे कृत्य करून त्यांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली.

प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील



'कबरीवर जाण्यावरून वाद कशाला' : खुलताबाद येथे ऐतिहासिक वारसा असलेल्या दर्गा आहेत. तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळी त्यां ठिकाणी असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर गेलो. आमच्यात कोणाची कबर दिसली की प्रार्थना करण्याची परंपरा आहे. त्याला आम्ही डावलू शकत नाही, त्यावर राजकारण कशासाठी, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Akbaruddin Owaisi Visit to Aurangzeb Grave : आमदार अकबरुद्दीन ओवेसीची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नवा वाद पेटण्याची शक्यता

Last Updated :May 12, 2022, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.