ETV Bharat / city

परमबिर सिंग यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस उपअधीक्षकांनी केले गंभीर आरोप

author img

By

Published : Jul 6, 2021, 9:51 AM IST

नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कामात ढवळाढवळ करून खोट्या आत्महत्या प्रकरणात अडकवल्याचं निपुंगे यांनी म्हटलंय. याप्रकरणी त्यांनी परमबिर सिंग यांच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Priority : Normal
Priority : Normal

नाशिक - वादाच्या भोवर्‍यात सापडलेले सध्याचे निलंबित मुंबईचे पोलीस आयुक्त तर तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्या बेकायदेशीर कामात ढवळाढवळ केली. तसेच ते सांगतील तसे काम केले नाही म्हणून एका महिला हवालदारच्या आत्महत्या प्रकरणात आपणास अडकवल्याचा गंभीर आरोप नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी परमबिर सिंग यांच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

निपुंगे यांच्या म्हणण्यानुसार जून 2016 ते ऑगस्ट 2017 दरम्यान भिवंडी येथील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त असताना भिवंडी वाहतूक शाखेअंतर्गत येत असलेल्या नारपोली वाहतूक विभागात सिंग यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी मोठी आर्थिक देवाण-घेवाण करून नियुक्ती मिळवली होती. सहाय्यक आयुक्त असतानाही हे अधिकारी माझे कोणतेही आदेश पळत पाळत नव्हते. तसेच मोठी आर्थिक गैरव्यवहार, वाहन मालक तसेच गोदाम मालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करत होते, यात आपण हस्तक्षेप केल्याचा त्यांना राग होता. याच काळात एका महिला हवालदाराने आत्महत्या केली होती. तिने काही दिवसांपूर्वी आपल्याशी कामानिमित्त तसेच वैयक्तिक अडचणीबाबत मोबाईल द्वारे संभाषण केले होते. ती वाहतूक शाखेत कार्यरत होती, हा धागा पकडत तिच्या आत्महत्येत माझे नाव अडकवले. वास्तविक ती आत्महत्या नव्हे तर संशयास्पद खून झाल्याचं स्पष्ट असतानाही केवळ परमबिर सिंग यांच्या सांगण्यावरून आपणास अडकवले असल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केली आहे.

परमबिर सिंग यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

परमबिर सिंग यांच्यावर यापूर्वी झालेले आरोप -

अकोला पोलीस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या बी. आर घाडगे या पोलीस निरीक्षकाने परमबीर सिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. या तक्रारीत या पोलीस अधिकाऱ्याने परमबीर सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेला होता. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता.

मुख्यमंत्री ठाकरेंना लिहले होते पत्र

पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पत्रामध्ये घाडगे यांनी 2013 मध्ये कल्याण मधील एका गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडून दबाव टाकला गेल्याचा आरोपही केलेला आहे. परमबीर सिंह यांनी सांगितल्या प्रमाणे आपण काम केले नाही, म्हणून आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी केलेला आहे.

परमबीर सिंह यांच्या बरोबर इतर 32 जणांच्या विरोधातसुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बी आर घाडगे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये ते शेड्युल कास्ट- शेड्युल ट्राईब समाजातून येत असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता असाही आरोप करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.