ETV Bharat / city

Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar : नाशिककरांशी संवाद साधून व्हिजन ठरवणार : डॉ. पुलकुंडवार

author img

By

Published : Jul 24, 2022, 10:42 AM IST

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नाशिकच्या माजी मुख्यमंत्री ठाकरे ( Former CM Uddhav Thackeray ) यांचे जवळचे समजले जाणारे आयुक्त रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ( Chandrakant Pulkundwar ) यांनी आयुक्तपदाचा आज ( Municipal Corporation of Nashik ) पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना, नागरिकांशी संवाद साधून आम्ही जबाबदारी सर्व कामे पार पाडू, असे आश्वासन दिले.

Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar
नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

नाशिक : रस्ते विकास महामंडळामध्ये काम करताना समृद्धी महामार्गासाठी आम्ही शासन व गावकरी यांच्यात मतभेद दूर करण्यासाठी आम्ही संवादक नेमले होते. त्याच धर्तीवर नाशिककरांशी संवाद साधत आगामी काळात नाशिक शहराचे व्हिजन ठरवू, अशी माहिती महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ( Chandrakant Pulkundwar ) यांनी सांगितले. शहरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांची मते ऐकून घेईल. त्यानंतर आवश्यक सोईसुविधांसाठी प्राधान्याक्रम ठरवून काम केले जाईल. महापालिकेला ( Municipal Corporation of Nashik ) नागरिकांना जे देणे लागते ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी नाशिककरांना दिली आहे. ( Former CM Uddhav Thackeray )

नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

माजी आयुक्त रमेश पवार यांची दांडी ठरला चर्चेचा विषय : शनिवारी सायंकाळी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मात्र, माजी आयुक्त रमेश पवार यांची दांडी चर्चेचा विषय ठरला आहे. रमेश पवार यांची आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांच्या जागी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. अधिकार्‍यांशी संवाद साधून विविध विभागाची माहिती जाणून घेणार आहे. त्यानंतरच भूसंपादन गैरव्यवहार व इतर विषयांवर बोलणे उचित ठरेल.

महापालिकेचे चौवीतासावे आयुक्त : राज्यात सत्तांतर होताच माजी मुख्यमंत्री ठाकरे यांचे जवळचे समजले जाणारे आयुक्त रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. डॉ. पुलकुंडवार यांनी आयुक्तपदाचा आज पदभार स्वीकारला आहे. ते महापालिकेचे चौतीसावे आयुक्त ठरले आहेत. नाशिकच्या महापालिकेत आता नव्याने कामांची सुरुवात करून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही नवनियुक्त आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

हेही वाचा : Video : आताच कसे पायाला भिंगरी लावली तसे फिरतात? गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.