ETV Bharat / city

Alcohol party at Hospital : नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दारुपार्टी; रुग्णालयात चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी

author img

By

Published : Apr 29, 2022, 3:25 PM IST

Updated : Apr 29, 2022, 4:10 PM IST

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital Nashik) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली. याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे.

Alcohol party
झाकीर हुसेन रुग्णालयात दारुपार्टी

नाशिक - नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital Nashik) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली. याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. टेबलावर मद्याची बाटली, सोडा व चकना ठेवल्याचे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बी.बी.नागरगोजे - वैद्यकीय आरोग्य अधिकारी

परवानगी घेऊन चित्रपट चित्रीकरण सुरू असल्याची माहिती - चित्रीकरणामुळे कर्मचारी शुटिंग बघण्यात व्यस्त होते. तर दुसरीकडे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल झाले. रुग्णालयातच दारू पार्टी रंगत असल्याने खळबळ उडाली. दरम्यान, याच रुग्णालयात वर्षभरापूर्वी गॅस गळतीमुळे २२ जणांनी प्राण गमावले होते. परवानगी घेऊन चित्रपट चित्रीकरण सुरू असल्याचे समजते, पण अटी शर्तींचा भंग झाल्याचे उघड होत आहे.

गुरुवारी (28 मार्च) रात्रीच्या सुमारास काही हाँस्पिटल कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन केल्याची माहिती मिळत आहे. या तपासणीत तीन ते चार कर्मचारी हे मद्यप्राशन करत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी आयुक्तांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हॉस्पिटलचे कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल, झाकीर हुसेन येथे कोविडचे रुग्ण कमी झाल्याने तिथे चित्रीकरणास अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. मद्यप्राशन करणारे कर्मचारी हॉस्पिटलचे आहेत याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

Last Updated : Apr 29, 2022, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.