ETV Bharat / city

Youth Murder Nagpur : नागपुरात रागाने पहिल्याच्या वादातून तरुणाची हत्या, आरोपीला अटक

author img

By

Published : May 10, 2022, 9:00 PM IST

Updated : May 10, 2022, 9:25 PM IST

नई बस्ती परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सागर संजय शाहू असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृतक सागर हा बिअर बारमध्ये गेला असताना काही आरोपींसोबत त्याचा वाद झाला. यावरुनच तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

तरुणाची हत्या
तरुणाची हत्या

नागपूर - शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई बस्ती परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सागर संजय शाहू असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृतक सागर हा बिअर बारमध्ये गेला असताना काही आरोपींसोबत त्याचा वाद झाला. एकमेकांना रागाने बघितल्याचे कारणाने उद्भवलेल्या वादातून चार आरोपींनी संगनमत करून सागरची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी विलसन पिल्लेसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी

पोलिसांच्या माहितीनुसार सदर परिसरातील एका बारमध्ये आरोपी विलसन आणि त्याचे मित्र दारू पीत बसले होते. तेवढ्यात सागर हा सुद्धा मित्रांसोबत दारू पिण्यासाठी बारमध्ये गेला होता. मृतक आणि आरोपींचे टेबल अगदी समोरासमोर होते. त्याचवेळी मृतकाने विलसनकडे रागाने पाहिले म्हणून दोघात वाद झाला. काही वेळानंतर दोघेही बारच्या बाहेर पडले. मात्र आरोपी विलसन याने मित्रांच्या मदतीने सागरचा पाठलाग सुरू केला. सागर हा त्याच्या वस्तीत पोहचताच आरोपींनी त्याच्या मानेवर आणि कंबरेवर धारधार शस्त्रांनी वार केले. ज्यामुळे सागरचा मृत्यू झाला आहे.


48 तासात दोन हत्या : रविवारी रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून विजय अंकुश तायवाडे नामक रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपी अटक होण्यापूर्वीचे सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई बस्ती भागात सागर संजय शाहू नामक तरुणाची हत्या झाली आहे.

हेही वाचा - Nagpur Youth Murder : नागपुरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; संशयीतांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Last Updated : May 10, 2022, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.