ETV Bharat / city

Nitin Gadkari over rule break : लोककल्याणासाठी कायदा मोडावा लागला तरी मंत्री म्हणून मोडणार - केंद्रीय मंत्री गडकरी

author img

By

Published : Aug 9, 2022, 4:39 PM IST

लोकांच्या कल्याणासाठी 10 वेळा कायदा मोडावा लागला तरी चालेल, कायदा ( nitin gadkari Inaugurate tribal research project in Nagpur ) तोडण्याचे काम मंत्री ( nitin gadkari news nagpur ) म्हणून आमचे आहे, सरकार आमच्या मताने ( nitin gadkari over rule brake ) चालणार, तुमच्या मताने नाही, अशा शब्दात अधिकाऱ्यांना ( nitin gadkari over roads in tribal area ) खडसावत कायदा मोडून 450 गावांना रस्ते बांधून जोडण्याचे काम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

nitin gadkari Inaugurate tribal research project in Nagpur
आदिवासी संशोधन प्रकल्प उद्घाटन नागपूर नितीन गडकरी

नागपूर - लोकांच्या कल्याणासाठी 10 वेळा कायदा मोडावा लागला तरी चालेल, कायदा ( nitin gadkari Inaugurate tribal research project in Nagpur ) तोडण्याचे काम मंत्री ( nitin gadkari news nagpur ) म्हणून आमचे आहे, सरकार आमच्या मताने ( nitin gadkari over rule brake ) चालणार, तुमच्या मताने नाही, अशा शब्दात अधिकाऱ्यांना ( nitin gadkari over roads in tribal area ) खडसावत कायदा मोडून 450 गावांना रस्ते बांधून जोडण्याचे काम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपुरात आदिवासी संशोधन प्रकल्पाचे शुभारंभ जागतिक आरोग्य दिन आणि आदिवासी दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सदर विधान केले.

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हेही वाचा - Nana Patole : सरकार न्यायव्यवस्था, संविधानापेक्षा मोठे आहे का?; नाना पटोले यांचा सवाल

सरकार हे आम्ही म्हणू तसे चालेल - 1995 मध्ये राज्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गडचिरोली आणि मेळघाटमध्ये 2 हजार आदिवासी बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. त्यावेळी 450 गावांना रस्ते नव्हते आणि रस्ते बांधण्यासाठी वन विभागाचे कायदे अडसर ठरत होते. रस्ते नसल्याने विकास होत नव्हता. त्यामुळे, गरिबांचे कल्याण करण्यासाठी कोणताच कायदा आडवा येणार नाही त्यासाठी 10 वेळा कायदा मोडावा लागला तरी चालेल तो तोडला पाहिजे, असे महात्मा गांधींजीनीही सांगितले. तो कायदा तोडण्याचा अधिकार माझा आहे, कारण मी मंत्री आहे, असे गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितले. तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही. सरकार हे आम्ही म्हणू तसे चालेल. कायदे मोडत 450 गावांत रस्ते बांधून त्या आदिवासी भागाला स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळून देण्याचे काम करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.

आदिवासी भागातील नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावा - या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ आदिवासी भागात जाऊन संशोधन नाही तर त्याना सरकारच्या ट्रायबल विभागामार्फत मोफत औषध उपचार मिळाला पाहिजे. गंभीर आजार असणाऱ्यांना शस्त्रक्रिया असो की अन्य सुविधा उलब्ध करून त्यांना रोगमुक्त करण्याचे काम झाले पाहिजे, अशाही सूचना आदिवासी विभागाचे आयुक्त राजेंद्र ठाकरे यांना गडकरी यांनी दिल्यात. तसेच, या उपक्रमाला शुभेच्छा सुद्धा दिल्यात. आदिवासी हे जंगल भागात राहतात. पण, त्याचे काही फायदे आणि तोटेही आहे. त्यामुळे, आदिवासी लोकांसाठी शिक्षणाची सोय करणे, स्वास्थ सुविधा देणे, आर्थिक विकासासाठी रोजगार देण्याचे काम त्यांचा विकास साधण्यासाठी केले पाहिजे, असेही गडकरी म्हणालेत.

काय आहे हा उपक्रम - दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवसीचे स्वास्थ संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वतीने संशोधन केले जाणार आहे. आदिवासींच्या आरोग्य विषयी विदर्भात जगातील सर्वात मोठा प्रकल्प राबवणार असल्याचा दावा केला जात आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर, नागपुर पारशिवणी भंडारा गोंदिया या तीन विभागातील प्रत्येकी सहा गावांची निवड करण्यात आली आहे. यात दुर्धर ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, यकृत कॅन्सर, हाडांचा ठिसूळपणा, यासह अन्य असे आजाराचे रुग्ण शोधत त्यांच्यावर उपचार केले जाणार. यातून मिळणारी माहिती त्यावर वैदकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी संशोधन करतील. या स्मपूर्ण संशोधनाची माहिती अहवाल राष्ट्रपती यांना सुपूर्द केला जाणार आहे. तसेच पुढील तीन वर्षे आरोग्य विद्यापीठ नाशिकच्या वतीने आदिवासी लोकांची सेवा सुद्धा केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विद्यापीठाचे डॉ. संजीव चौधरी यांनी दिली.

हेही वाचा - Nagpur Police : राज्यात कुठूनही करा डायल 112; नागपूर ग्रामीण पोलिसांचा रिस्पॉन्स, राज्यात अव्वल !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.