ETV Bharat / city

नागपुरात कोरोना लसीचा तुटवडा; दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक

author img

By

Published : Apr 9, 2021, 3:41 AM IST

नागपूर जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळत असताना अनेक मोठ्या सेंटरवर लसींचा साठा संपला आहे.

vaccine
लसीकरण

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रभावीपणे लसीकरण मोहिमेची अमलबाजवणी केली आहे. यात जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळत असताना अनेक मोठ्या सेंटरवर लसींचा साठा संपला आहे. शासकीय रुग्णालयात मोजकेच डोस शिल्लक असून मेयो हॉस्पिटलमध्ये साठा संपला असल्याचे पुढे येत आहे.

नागपूर जिल्ह्यात 16 जानेवरीपासून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात 1 लाख 14 हजार डोस आले होते. यात नागपूर जिल्ह्याला 40 हजार डोस मिळाले होते. यात 34 केंद्रावर आरोग्य सेवेतील लोकांपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 2 फेब्रुवारीला पोलीस, स्वच्छता विभाग, यासह फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण देण्यात आले. 1 फेब्रुवारीपासून 65 वर्षावरील आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्यांचा यात समावेश करून लस द्यायला सुरुवात झाली. यात 1 एप्रिल पासून 45 वर्ष पेक्षा सर्वच नागरीकांना लस देण्यात आली असल्याने लसीची मागणी वाढली आहे.

जिल्ह्याला 4 लाख डोसेज मिळाले

जिल्ह्यात आतापर्यंत कोव्हिशिल्डचे 4 लाख 5 हजार 800 डोस मिळाले होते. तेच 22 हजार 800 डोसेस हे कोवॅक्सिनचे मिळाले होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली असून यात अनेक केंद्रावर लसी संपल्याने लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. यात सध्या 135 केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

हेही वाचा - 'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'

जिल्ह्यात 8 एप्रिलपर्यंत किती लोकांना मिळाली लस

नागपूर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेत 2 लाख 77 हजार 842 जणांना पहिला डोस यशस्वीपणे देण्यात आला आहे. तेच 24 हजार 28 जणांना दुसरा डोस देण्यात आला असून 3 लाख 1 हजार 870 लस देण्यात आली आहे. यामध्ये गुरुवारी 14 हजार 357 जणांना लस देण्यात आली. यामध्ये 13 हजार 150 जणांना पहिला डोज देण्यात आला असून 1207 जणांनी लस घेतली आहे.

दोन दिवस पुरणार इतकाच साठा उपलब्ध

एप्रिल महिन्यात सर्वत्र डोस नसल्याचे ओरड होत असतानाच उपराजधानीत हीच परिस्थितीत समोर येत आहे. यात नागपूर जिल्ह्यात जवळपास 25 हजारच्या घरात डोस काही केंद्रांवर शिल्लक आहेत. रोज सरासरी 11 ते 12 हजार जणांना लस दिली जात आहे. यात गुरुवारी आठ तारखेला 14 हजार जणांनी लस घेतली असून केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुढील साठा येत्या दोन दिवसात उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत 10 टक्के लसीकरण

नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या पाहता 30 लाखाचा घरात आहे. यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 3 लाखाचा घरात लसीकरण मोहीम पार पडली आहे. यामुळे तशी तुलना केल्यास केवळ 10 टक्क्यांच्या घरात लसीकरण झाले असून मोठा पल्ला गाठायचा आहे. यात 18 वर्षापर्यंतचा समावेश करण्यासाठी लसीकरण मोहीम अजून वेग वाढवण्याची गरज आहे. यासोबत लसीकरन केंद्रही वाढवण्याची गरज आहे.

हेही वाचा - 'रेमडेसिवीर' तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.