ETV Bharat / city

Sunil Kedar on Farmers issue : सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी : माजी मंत्री सुनील केदार

author img

By

Published : Jul 25, 2022, 9:33 AM IST

विदर्भात ( East Vidarbha ) मागील काही दिवसांत मुसळधार ( Heavy Rains ) पाऊस झाला. त्यामुळे पूरपरिस्थिती ओढवली. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम हातचा ( Damage to Kharif Crops ) गेला आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे रब्बी पिकासाठी आतापासून नियोजन करण्याची मागणी सुनील केदार ( Former minister Sunil Kedar ) यांनी केली आहे. ते नागपूर जिल्ह्यातील अनेक भागांत जाऊन पदाधिकरी यांच्यासोबत पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीच्या आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. सरकारने निकष बाजूला ठेवून नैसर्गिक संकटात अधिकाधिक मदत देण्याची मागणी केली आहे. ( By Order of Congress Pradesh Committee )

Former Minister Sunil Kedar
माजी मंत्री सुनील केदार

नागपूर : मागील काही दिवसांपासून सततच्या पावसाने ( Heavy Rains ) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात ( East Vidarbha ) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम हातचा ( Damage to Kharif Crops ) गेला आहे. त्यामुळे रब्बी पिकासाठी आतापासून नियोजन करण्याची मागणी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांनी ( Former minister Sunil Kedar ) केली आहे. ते नागपुरात काँग्रेस प्रदेश कमिटीच्या ( By Order of Congress Pradesh Committee ) आदेशावरून जिल्ह्यातील अनेक भागांत जाऊन पदाधिकरी यांच्यासोबत पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या परिस्थितीच्या आढावा घेतला.


अतिवृष्टीमुळे पुराने खरीप पिकांचे नुकसान : सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या एका विशेष समितीने नागपूर जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. या घेतलेल्या आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. तसेच, सरकारने निकष बाजूला ठेवून नैसर्गिक संकटात अधिकाधिक मदत देण्याची मागणी केली आहे. दोन दिवस चाललेल्या या दौऱ्यानंतर केदार यांनी नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामाची पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त ( Damage to Kharif Crops ) झाल्याचा दावा केला आहे. या पावसाच्या प्रकोपाने कापूस, सोयाबीन हे विदर्भातील पारंपरिक पीकच नाही, तर भाजीपाला पीकसुद्धा हातचे गेले. पुन्हा पेरणीयोग्य जमीन नाही, त्यामुळे खरीप गेला. आता रब्बीसाठी पाणी, खत, बियाणे यांचे नियोजन करण्याची गरज आहे.

माजी मंत्री सुनील केदार यांची मागणी

जिल्ह्यातील फळांच्या बागांचे नुकसान : नागपूर जिल्ह्यातील संत्रा, मोसंबीच्या बागांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचा दावा केदार यांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे झाडावरील मोसंबी, संत्रा गळ झाल्याने येणारा हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे या वर्षी मृग बहाराची संत्री किंवा मोसंबी खायला मिळणार नाही, असे केदार म्हणाले.

निकष बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत करावी : राज्यात नव्याने आलेल्या सरकारने खुल्या हाताने शेतकऱ्यांना मदत करावी. या पूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुराच्या काळात एसडीआरएफ आणि एनडीआरएफचा निकषापुढे जाऊन ज्या पद्धतीने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. त्याच धर्तीवर विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री सुनील केदार यांनी केली आहे.

हेही वाचा : MBBS Admission Scam : कोल्हापुरातील एससीएसईएस संस्थेत एमबीबीएस प्रवेश घोटाळा, 350 विद्यार्थ्यांची 65 कोटींची फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.