ETV Bharat / city

Navneet Rana : नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाल्या, "महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाला..."

author img

By

Published : May 28, 2022, 6:33 PM IST

महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाला पाहिजे, यासाठी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा टोला नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला ( Navneet Rana Taunt Cm Uddhav Thackeray ) आहे.

Navneet Rana
Navneet Rana

नागपूर - दिल्लीमध्ये हनुमान चालीसा पठण केले, पण कुठलाही विरोध केला नाही. उलट तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा सुविधा पुरवण्यात आली. दिल्ली सरकारने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले, त्यासाठी त्यांचे धन्यवाद करते. मात्र, महाराष्ट्रात हनुमानजींना एवढा विरोध का?, असा सवाल खासदार नवनीत राणांनी उपस्थित केला आहे. तसेच, महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाला पाहिजे, यासाठी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचेही नवनीत राणांनी म्हटले ( Navneet Rana Taunt Cm Uddhav Thackeray ) आहे.

जेलमध्ये टाकण्याचा एकसूत्री कार्यक्रम - रवी राणा यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आल्यानंतर सरकारची झोप उडते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या माध्यमातून जो हनुमानचे नाव घेतील त्याला जेलमध्ये टाकण्याच्या एकसूत्री कार्यक्रम चालवलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. येणाऱ्या काळात हनुमान भक्त या मुख्यमंत्र्यांना धडा शिकवेल.

उद्धव ठाकरे नावाचे जे संकट महाराष्ट्रावर आलेला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे, बेरोजगारी वाढली आहे. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री यांनी विदर्भात पाय ठेवला नाही. मंत्रालयात पाय ठेवला नाही. या परिस्थितीत महाराष्ट्राची जनता राज्याचे मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त झाली आहे. यासाठी शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या रुपात आलेले हे विघ्न दूर झाले पाहिजे, अशी टीका रवी राणांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

हेही वाचा - Shahu Chhatrapati : संभाजीराजेंना पाठिंबा पाहिजे होता तर फडणवीसांकडे गेले तसे इतर नेत्यांकडेसुद्धा जाणे गरजेचे होते - शाहू छत्रपती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.