ETV Bharat / city

नागपूरात 58 जणांचा बळी, 3 हजार 970 बाधितांची भर

author img

By

Published : Mar 29, 2021, 6:31 AM IST

नागपूरात रविवारी कोरोनामुळे 58 जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या दोन दिवसात एकूण 112 जण दगावले आहेत. तर 3 हजार 970 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात 37 हजार 776 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

नागपूर
नागपूर

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यू दरातही वाढ झाली आहे. रविवारी कोरोनामुळे 58 जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या दोन दिवसात एकूण 112 जण दगावले आहेत. तर 3 हजार 970 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात 37 हजार 776 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

दररोज मिळणाऱ्या नवीन कोरोना बधितांमुळे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. उपचारासाठी बेड कमी पडत असल्याची ओरड होत आहे. यामुळे गृहमंत्री यांनी विभागीय कार्यालयात बैठक घेऊन दररोज किमान 30 बेड वाढवण्याचे म्हटलं आहे. रविवारी आलेल्या अहवालात 16 हजार 155 जणांची चाचणी करण्यात आली आहे.

शहरात 2 हजार 950 तर 1 हजार 17 ग्रामीण भागात बाधित रुग्ण आढळले आहे. 3 हजार 970 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पूर्व विदर्भात 5 हजार 273 बाधितांची भर पडली असून 64 जण हे कोरोनामळे दगावले आहे. 3 हजार 970 नागपूरात, भंडारा येथे 439, चंद्रपूर जिल्ह्यात 341, गोंदियात 107, वर्ध्यात 344 तर गडचिरोलीत 42 बधितांची भर पडली आहे. तर 4 हजार जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा - राष्ट्रवादी-भाजपमध्ये काहीतरी शिजतंय..? शरद पवारांसोबत बैठकीबाबत अमित शाह यांचे सूचक वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.