ETV Bharat / city

नागपुरात तब्बल 1 लाख 80 हजार प्रवाशांनी महिन्याभरात केला लालपरीने प्रवास

author img

By

Published : Jun 15, 2022, 3:40 PM IST

खासगी वाहनाने प्रवास करतांना काही अडचणी असायच्या. यात बसचे वाहक हे बहुतांश चांगले असतात ते बसण्याची व्यवस्था करून देतात. काही प्रवाशी समजून घेतात पण काही घेत नसल्याची खंतही शितलेने व्यक्त केली. पण एकंदर बसचा प्रवास हा सुरक्षित आणि आम्हाला आर्थिक परवडणारा असतो असेही शीतलने बोलतांना सांगितले.

1 lakh 80 thousand passengers traveled by st in a month at nagpur
नागपुरात तब्बल 1 लाख 80 हजार प्रवाशांनी महिन्याभरात केला लालपरीने प्रवास

नागपूर - सर्वसामान्यांना हक्काचा आणि सुरक्षित प्रवास देणारी लाल परी अशी ओळख असलेल्या एसटी महामंडळाला 74 वर्षे पूर्ण झाले. पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण केले. कोरोनासारख्या महामारीचे संकट, पाच महिने लांबलेला संप त्यानंतर आता एसटी महामंडळ पुन्हा पूर्ववत प्रवाशांना सेवा देत आहे. मागील एक महिन्यात 1 लाख 82 हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे. या संख्येवरून एसटीचे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातील महत्व पुढे येते. यातच दररोज प्रवास करण्याऱ्यासाठी दिव्यांग बांधवांसह अन्य प्रवाशांनी वाढदिवस आणि प्रवाशी सेवा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला.

खासगी वाहनांचा पर्याय नाईलाजाने निवडावा लागला - कोरोनाच्या काळात प्रवासाठी नागरिक घरा बाहेर पडले नाही. पण कुठेतरी त्यातून बाहेर पडत असताना अचानक मागील वर्षी ऐन दिवाळीत संप पुकारला. मागण्यांना धरून हा संपाचा कालावधी वाढला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हक्काचा प्रवास ही त्या काळात थांबला. याच काळात खासगी वाहनांचा पर्याय नाईलाजाने निवडावा लागला. पण त्यातही लूट झाली अव्वाच्या सव्वा पैसे प्रवासासाठी घेण्यात आले. यामुळे अनेकांच्या खिशाला चाप बसला.

बसचा प्रवास हा सुरक्षित - यात डोळ्याने दिव्यांग असणारी शीतल मेश्राम हिला राळेगाव येथून प्रवास करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याचे तिने ईटीव्हीशी बोलतांना सांगितले. यात आता बस सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला. अनेकदा बस बंद असल्याने कॉलेजला जाऊ शकत नसल्याचे ती सांगते. खासगी वाहनाने प्रवास करतांना काही अडचणी असायच्या. यात बसचे वाहक हे बहुतांश चांगले असतात ते बसण्याची व्यवस्था करून देतात. काही प्रवाशी समजून घेतात पण काही घेत नसल्याची खंतही शितलेने व्यक्त केली. पण एकंदर बसचा प्रवास हा सुरक्षित आणि आम्हाला आर्थिक परवडणारा असतो असेही शीतलने बोलतांना सांगितले. मंगेश वंजारी यानेही असाच काहीसा अनुभव सांगितला. तो सुद्धा दिव्यांग असल्याने बसची सूट न मिळाल्याने आर्थिक फटका बसल्याचे तो सांगत होता. बसचे वाहक अनेकदा आम्हाला योग्य ठिकाणी उतरुन देतात. पण खासगी वाहनाचा प्रवास करताना अनेकदा अडचणी अनुभवल्या आहेत.

बस सुरू झाल्याचा आनंद - विवेक टेम्भुरने हा मूळचा भंडारा जिल्हातील असून तो नौकरीनिमित्य नियमित मागील तीन वर्षांपासून नागपूर भंडारा असा दररोज सहा तास बसचा प्रवास करतो. मध्यंतरी बसच्या संपकाळात त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला. यात कधी वेळेवर पोहचण्यास अडचणी गेल्याचे तो सांगतो. आता मात्र, नियमित बसेस सुरू झाल्याने तो आनंद व्यक्त केला.

एक महिन्यात 1 लाख 80 हजार प्रवाश्यांची नोंद - नागपूरच्या गणेशपेठ आगारात आज एसटीचा 75 वा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून आणि प्रवाश्याना पेढे वाटण्यात आले. आजचा वाढदिवस दिवस साजरा करण्यात आला. एप्रिल महिन्यात संपानंतर एसटी पूर्वपदावर सुरू झाली. पण त्या आठवड्यात पाहिजे त्या प्रमाणात प्रवाश्याचा प्रतिसाद मिळाला नाही. तेच मे महिन्यात पुन्हा नागरिकांनी बस स्थानकाची वाट धरली. मागील महिन्या भरापासून एक लाख 82 हजार 501 प्रवाश्यानी एसटी महामंडळच्या बसने प्रवास केला. मागील एक महिन्याच्या कालावधीत 9 लाख 26 हजार 213 किलोमीटरचे अंतर 3480 फेऱ्या करत पूर्ण केल्याची माहिती गणेशपेठ आगार प्रमुख अनिल आमनेरकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.