ETV Bharat / city

आमदार सुहास कांदे यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार - अक्षय निकाळजे

author img

By

Published : Sep 29, 2021, 8:48 PM IST

कांदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पुतण्याने मला धमकीचा फोन केला, असा आरोप केला होता. हे आरोप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी फेटाळून लावले आहेत. उलट खोट्या आरोपांबद्दल आमदार कांदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा अक्षय यांनी दिला.

Akshay Nikalje warning to Suhas Kande
छोटा राजन टोळी धमकी आरोप सुहास कांदे

मुंबई - कांदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पुतण्याने मला धमकीचा फोन केला, असा आरोप केला होता. हे आरोप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी फेटाळून लावले आहेत. उलट खोट्या आरोपांबद्दल आमदार कांदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा अक्षय निकाळजे यांनी दिला.

माहिती देताना अक्षय निकाळजे

हेही वाचा - CET 2021 Re Exam : सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी - मंत्री उदय सामंत

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील प्रसारित झाले होते. त्यानंतर आक्रमक झालेले कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप करत छगन भुजबळांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे घ्यावी म्हणून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्रही दिले होते. या प्रकरणाला आता नवीन कलाटणी मिळाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.

मी फोन केला हे खरे आहे. नाशिकवरून परत येताना टोल नाक्यावर आमच्या कार्यकर्त्यांना टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी मारहाण केली होती. त्यासाठी त्यांना फोन केला होता. हा टोल नाका सुहास कांदे यांचे भाऊ चालवतात यासाठी फोन केला होता. मी फोनवर कुठलीही धमकी दिली नाही. मी मंत्री छगन भुजबळ यांना कधी भेटलोसुद्धा नाही. मी या आमदाराचीच तक्रार देणार आहे. तसेच, मानहाणीचा दावा न्यायालयात करणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केले, असा आरोपही अक्षय निकाळजे यांनी केला. विनाकारण या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. यावर न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करू, तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे अक्षय निकाळजे यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान, विजय वडेट्टीवार यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.