ETV Bharat / city

अभियंता मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांवर कारवाई कधी? किरीट सोमय्यांचा सवाल

author img

By

Published : Oct 6, 2020, 6:50 PM IST

अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यानुसार मारहाण झाली, असा आरोप करमुसे यांनी केला होता. त्यानंतर राज्यभर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले होते. सहा महिन्यानंतर या प्रकरणात तीन पोलिसांवर कारवाई झालेली आहे. पण या प्रकरणात ज्यांच्या सांगण्यावरून मारहाण झाली. त्या मंत्र्यांना कधी अटक होईल, असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

kirit somaiya
जितेंद्र आव्हाडांवर कारवाई कधी? किरीट सोमय्या यांचा सवाल

मुंबई - ठाण्यातील शिव प्रतिष्ठान कार्यकर्ते व अभियंत्याला मारहाण झाल्याप्रकरणी ३ पोलिसांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. परंतू ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कधी कारवाई होणार? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटवरून विचारला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत : च्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचे अपहरण केले असे म्हणत, घरी नेले आणि मारहाण केली. याप्रकरणी सरकारने सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार ? " असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत उपस्थित केला आहे.

काय होत अनंत करमुसे मारहाण प्रकरण


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानानी ५ एप्रिलच्या रात्री दिवे लावण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला विरोध करत जिंतेंद्र आव्हाड यांनी विरोधी प्रतिक्रिया सोशल मीडियात व्यक्त केली होती. त्यावर ठाण्यातील उन्नती वुडस येथे राहणारे अनंत करमुसे या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व इंजिनियरने आव्हाड यांच्या विरोधात फेसबुकवर एक पोस्ट टाकली. त्याचाच राग मनात धरुन ५ एप्रिलच्या रात्री ११ :५०च्या सुमारास दोन गणवेषातील पोलीस व दोघे साध्या वेषातील पोलीस या तरुणाच्या घरी आले आणि तुम्हाला पोलिस स्टेशनला बोलवले आहे, असे सांगून बळजबरीने स्कॉर्पिओ व इनोव्हा गाडीतून सायबर गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याऐवजी थेट जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना माॅलमागील नाथ बंगल्यावर नेऊन पोलिसांच्या फायबर काठीने मारहाण केली होती. ही मारहाण जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यानुसार झाली आहे, असा आरोप करमुसे यांनी केला होता. त्यानंतर राज्यभर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले होते. सहा महिन्यानंतर या प्रकरणात तीन पोलिसांवर कारवाई झालेली आहे. पण या प्रकरणात ज्यांच्या सांगण्यावरून मारहाण झाली. त्या मंत्र्यांना कधी अटक होईल, असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.