ETV Bharat / city

Publication of Modi-20 book 'मोदी-२०' व्यवस्था परिवर्तनाची २० वर्षे पुस्तकाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रकाशन

author img

By

Published : Sep 15, 2022, 10:01 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा २० वर्षांचा आढावा घेणारे 'मोदी @ २०' या पुस्तकाचे प्रकाशन (Publication of Modi-20 book) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman) यांच्या हस्ते मुंबईत पार पडले. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनाचा मागील २० वर्षांचा प्रवास व त्यांनी घेतलेले निर्णय यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला असून, प्रशासक कसा असावा? यावर या पुस्तकात जास्त भर देण्यात आला आहे.

Publication of Modi-20 book
'मोदी-२०' व्यवस्था परिवर्तनाची २० वर्षे पुस्तकाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा २० वर्षांचा आढावा घेणारे 'मोदी @ २०' या पुस्तकाचे प्रकाशन (Publication of Modi-20 book) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman) यांच्या हस्ते मुंबईत पार पडले. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनाचा मागील २० वर्षांचा प्रवास व त्यांनी घेतलेले निर्णय यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला असून, प्रशासक कसा असावा? यावर या पुस्तकात जास्त भर देण्यात आला आहे.

मोदींकडे दुरदृष्टी -सीतारामन याप्रसंगी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कुठलही पाठबळ नसताना मोदी पुढे आले. गुजरातसारख्या राज्यात अनेक आव्हाने असताना ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळी गुजरातने मोठा भूकंप बघितला होता. संपूर्ण कच्छ जमीनदोस्त झाले होते. त्यावेळी अशी एक व्यक्ती त्यांनी प्रशासन व्यवस्था मार्गी लावली. ज्यांना पोहता येत नव्हते अशी व्यक्ती स्वतः पाण्यात उतरली. पण ते बुडाले नाहीत तर बुडणाऱ्या गुजरातला वर घेऊन आले. अशा शब्दांत सीतारामन यांनी मोदींची स्तुती केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लेकन केले आहे.

काँग्रेसने फक्त आश्वासने दिली -सीतारामन कोविड काळात टेस्टिंग लॅब नव्हत्या. जनता त्रस्त झाली होती. इतका मोठा देश काय होणार? पण सर्व टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या. गरीबी हटाव, गावं तक पिनेका पाणी अशी अनेक आश्वासने अगोदरच्या पंतप्रधानांनी दिली. गावापर्यंत वीज गेली. पण घरा पर्यंत नाही गेली. गावा पर्यंत पाणी गेले. पण घरा पर्यंत गेले नाही. असा टोमणा त्यांनी काँग्रेसला लगावत मोदी यांनी ते करून दाखविले, असे सांगितले.

स्वतःच्या पायावर उभे राहायला मोदींनी ताकद दिली सबका साथ, सबका विकास, लेकीन सबका प्रयास हे महत्वाचे आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना फार महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकाल अशा योजना मोदी आणत आहेत. लसीकरणाबाबत मोदींनी विशेष योजना राबवली. त्यांना देशातील अशक्तपणा माहित आहे. ११६ जिल्ह्यात अजून आपण कमी आहोत. असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच प्रशासन कामाला लावले, हे आहेत मोदी... सांगत हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे असे आवाहन निर्मला सीतारामन यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.