ETV Bharat / city

Uddhav Thackeray on Dasara Gathering बाळासाहेबांची आम्ही पंरपरा चालवित आहोत, परंपरेला गालबोट लागेल असे कृत्य करू नका- उद्धव ठाकरे

author img

By

Published : Sep 23, 2022, 7:32 PM IST

Updated : Sep 23, 2022, 7:48 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची 1966 सालापासूनची परंपरा आहे. आजच्या निकालाने न्याय व्यवस्थेवरील विश्वास सार्थ ठरवला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसेना प्रेमींनो वाजत गाजत, गुलाल उधळत आणि शिस्तीने या. शिवसेनेच्या तेजाला, वारसाला आणि परंपरेला गालबोल लागेल, असे कृत्य करु नका.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, न्याय व्यस्थेचा विश्वास आज सार्थ ठरला, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला येताना वाजत, गाजत आणि गुलाल उधळत या. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था शिवसेनेच्या परंपरेचा गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घ्या असे आवाहन ठाकरे यांनी शिवसैनिकांना ( Uddhav Thackeray press conference ) केले.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या अर्जाला मुंबई महापालिकेने परवानगी ( Mumbai high court permission for Shiv sena ) नाकारली. शिवसेनेने यानंतर न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीं धनुका यांच्या खंडपीठा समोर आज सुनावणी झाली. न्यायलायने शिवसेनेला शिवाजी पार्कावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महापालिका आणि बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्यावर ताशेरे ओढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे ( Uddhav Thackeray appeal to shivsainik ) म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची 1966 सालापासूनची परंपरा आहे. आजच्या निकालाने न्याय व्यवस्थेवरील विश्वास सार्थ ठरवला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसेना प्रेमींनो वाजत गाजत, गुलाल उधळत आणि शिस्तीने या. शिवसेनेच्या तेजाला, वारसाला आणि परंपरेला गालबोल लागेल, असे कृत्य करु नका. इतर काय करतील, याबाबत नेम नाही. मात्र, आपली परंपरा जपा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. तसेच आजच्या निकालाकडे संपूर्ण जगातील बांधवांचे लक्ष लागले होते. कोरोना काळ वगळला तर शिवसेनेचा मेळावा कधीही चुकला नाही. आजच्या निकालाने न्याय देवतेचा निकाल सार्थ ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयातही लोकशाहीच्या भवितव्याचा निर्णय होईल, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

शिवसेना वाढली - शिवसेनेत दोन गट तयार झाल्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आहे तशीच आहे, उलट शिवसेना वाढल्याचे सांगत शिंदे गटाला फटकारले. तसेच कायदा आणि सुव्यवस्था न्यायालयाने सरकारवर टाकली आहे. आम्ही शिस्तीने येऊ, कायदा सुव्यवस्था जपण्याचे काम सरकारने करावे. नारायण राणेंवरही अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे गटाचा पहिला विजय- शिवसेना कुणाची खरी हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लढाईत दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे गटाचा पहिला विजय झाला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याने यावर्षी होणारा दसरा मेळावा मोठ्या प्रमाणात शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. 21 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या घेतलेल्या मेळाव्यामध्ये केंद्रीय भाजप नेतृत्वासह स्थानिक नेतृत्वावर कडाडून टीका केली होती.

Last Updated : Sep 23, 2022, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.